पत्नीकडून पतीला आणि सासरच्यांना मुद्दाम अडकवले जात आहे, कलम 498 चा गैरवापर होतोय; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली चिंता
विवाहित महिलांच्या सुरक्षिततेसाठी भारतीय दंड संहितेचे कलम 498 अ ची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये विवाहित महिलांकडूनच पतीला आणि सासरच्यांना अडकवण्यासाठी 498 अ या कलमाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे महत्त्वपूर्ण निरिक्षण नोंदवत चिंता व्यक्त केली आहे.
मागील काही वर्षांमध्ये देशभरात पती-पत्नी यांच्यातील वाद मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे विवाहित महिलांच्या माध्यामातून पतीला आणि सासरच्यांना अडकवण्यासाठी कलम 498 अ या कलामाचा गैरवापर केला जात आहे. याची सखोल चौकशी केली नाही तर, कायदेशीर प्रक्रियेचा विवाहित महिलांकडून मोठ्या प्रमाणात दुरुपयोग केला जाईल. तसेच पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांकडून पती आणि सासरच्यांना अडकवण्यासाठी डावपेच आखण्यास प्रोत्सोहान मिळेल, असे गंभीर निरिक्षण न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि ए. कोतीश्वर सिंग यांच्या खंडपीठाने नोंदवले आहे.
तेलंगणा उच्च न्यायालयात एका विवाहित महिलेने पती आणि सासरच्यांविरोधत हुंडाबळीचा खटला दाखल केला होता. तेलंगणा उच्च न्यायालयाने महिलेच्या बाजूने निकाल देत हुंडाबळीचा खटला फेटाळण्यास नकार दिला होता. या निकालाविरोधात पती आणि सासरच्या मंडळींनी सुप्रीम कोर्टामध्ये अपील केले होते. या अपिलावर सुनावणी पार पडली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने कलम 498 अ चा गैरवापर होत असल्याचे निरिक्षण नोंदवत तेलंगणा उच्च न्यायालयाने दिलेला निकाल फेटाळला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List