आपत्कालीन परिस्थीती हाताळण्यासाठी कोकण रेल्वे आणि NDRF ची प्रात्यक्षिके

आपत्कालीन परिस्थीती हाताळण्यासाठी कोकण रेल्वे आणि NDRF ची प्रात्यक्षिके

आपत्कालीन स्थितीत कशा पद्धतीने निर्णय घेत संकटकालीन परिस्थितीवर मात करायची, याची प्रात्यक्षिके नुकतीच NDRF व कोकण रेल्वेच्या टीमने रत्नागिरीत करून दाखवली. यावेळी कोकण रेल्वेसह रत्नागिरी जिल्हा प्रशासनातील विविध खात्यांचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

आपत्कालीन स्थिती निर्माण झाली तर सर्वप्रथम जिल्हाप्रशासनाच्या विविध विभागांना सतर्क होऊन काम करावे लागते. परिस्थिती गंभीर असेल तर NDRF च्या टीमला पाचारण केले जाते. नुकतीच NDRF च्या एका टीमने रत्नागिरी जिल्ह्याला भेट देत कोकण रेल्वेसह विविध विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसमोर विविध प्रात्यक्षिके सादर केली. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयाच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले होते. कोकण रेल्वेच्या विभागीय कार्यालयात NDRF आणि विविध खात्यातील अधिकाऱ्यांची विशेष बैठक पार पडली. यामध्ये आपत्कालीन स्थितीत निर्माण होणारी स्थिती, घ्यायचे निर्णय, खात्यांमधील परस्पर समन्वय यावर चर्चा करण्यात आली.

यानंतर NDRF च्या टीम ने कोकण रेल्वेच्या परिसरात आपत्कालीन स्थितीत त्यांची टीम कशा पद्धतीने काम करते, अडचणीच्या ठिकाणी अडकलेल्या व्यक्तीची कशा पद्धतीने सुटका करून त्यांना उपचारासाठी पाठवले जाते, याची प्रात्यक्षिके सादर केली. कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनीही यावेळी प्रात्यक्षिके सादर केली. कोकण रेल्वेच्या मार्गावरून खाली उतरलेल्या रेल्वे बोगीला पूर्ववत मार्गावर आणणे यासह अत्याधुनिक उपकरणाच्या साहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन कसे केले जाते याची प्रात्यक्षिके ही दाखवण्यात आली. यावेळी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचा आपत्कालीन विभाग, तहसीलदार कार्यालय, नगर परिषद अग्निशामक पथक, जिल्हा आरोग्य विभाग, नागरी संरक्षण दल, रत्नागिरी पोलीस दल, रेल्वे सुरक्षा दलाचे जवान असे विविध विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कोकण रेल्वेच्या वतीने रेल्वेचे मुख्य सुरक्षा अधिकारी नंदू तेलंग व उपमुख्य सुरक्षा अधिकारी बी जी मदनायक, विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट यांनी एन डी आर एफ चे वरिष्ठ अधिकारी राजू प्रसाद गौड व जवानांचे स्वागत केले. एन डी आर एफ चे पंचवीस जवान या प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी झाले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अर्जुनने सर्वांसमोर म्हटलं ‘मी सिंगल’; ऐकून मलायकाचा राग अनावर, म्हणाली “प्रत्येक ठिकाणी..” अर्जुनने सर्वांसमोर म्हटलं ‘मी सिंगल’; ऐकून मलायकाचा राग अनावर, म्हणाली “प्रत्येक ठिकाणी..”
जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी ब्रेकअप केला. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या लोकप्रिय जोड्यांपैकी ही...
फ्लाइंग किस, मेरी ख्रिसमस अन् Hi…; रणबीर-आलियाच्या लेकीने जिंकली नेटकऱ्यांची मनं
Actors Who Were Arrested in 2024 : कुणावर बलात्काराचा, तर कुणावर हत्येचा आरोप; 2024 मध्ये ‘या’ अभिनेत्यांना झाली अटक
पालिकेकडे 20 ट्रक केबलचा खच! ओव्हरहेड केबलचे करायचे काय ?
संकटांवर मात करीत कणदूरला गुऱ्हाळ उद्योग सुरु
नोटीस बजावूनही ठेकेदारांनी सादर केले अपुरे रेकॉर्ड, मोठा घोटाळा झाल्याचा ‘आप’चा आरोप
वसईच्या लाचखोर वनक्षेत्रपालच्या घरात मोठे घबाड; घराच्या झडतीत 57 तोळे सोने, 1 कोटी 31 लाखांची रोकड जप्त