हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करावी की गरम पाण्याने, एक्सपर्टने सांगितले फायदे?
थंडीत गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर काही जणांना जास्त थंडी वाजते. काही जण म्हणतात थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे स्ट्रोक येतो. एक्सपर्टने थंड पाण्याने आंघोळ करण्याचे अनेक फायदे सांगितले आहे. तसेच थंड पाण्याने आंघोळ करताना काय काळजी घ्यावी, तेही सांगितले.
थंड पाण्याने आंघोळ करताना सरळ डोक्यावर थंड पाणी घेऊ नये. आधी हात आणि पायांवर थंड पाणी टाकावे. त्यानंतर शरीरावर थंड पाणी टाकावे. तुमची प्रकृती लक्षात घेऊन थंड पाण्याने आंघोळीचा निर्णय घ्यावा. तुम्हाला बरे वाटत नसेल किंवा इतर काही आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर त्वचा आणि केसांचे नुकसान होते. डोक्यावर सरळ गरम पाणी गेल्यानंतर केस कमकुवत होतात. तसेच केसांमध्ये ड्रायनेस येते आणि चमकही कमी होते. गरम पाणी आंघोळीसाठी चांगला वाटत असले तरी त्याचे अनेक नुकसान आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List