जयपूरच्या कोचिंग सेंटरमध्ये गॅस गळती, 12 विद्यार्थिनी बेशुद्ध; दोघींची प्रकृती चिंताजनक
कोचिंग सेंटरमध्ये विषारी वायू पसरल्यामुळे 12 विद्यार्थिनी बेशुद्ध झाल्याची घटना जयपूरच्या गोपालपुरा भागात घडली. सात विद्यार्थिनींना सोमाणी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघींची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोचिंग सेंटरमध्ये गॅसचा कोणताही स्रोत नाही. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
जयपूरमधील उत्कर्ष कोचिंग सेंटरमध्ये दुर्गंधीयुक्त वायू पसरल्याने 12 विद्यार्थी बेशुद्ध झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार, मागच्या नाल्यातून हा विषारी वायू पसरल्याचे समजते. पाच विद्यार्थिनींना मानसरोवर येथील मेट्रो मास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.
कोचिंगच्या सर्व खिडक्या बंद होत्या. वर्ग सुरू असताना दारही बंद होते. कोचिंग सेंटरमध्ये विषारी वायूची उपकरणे नाहीत आणि गॅस पाइपलाइनही नाही. अशा स्थितीत हा उग्र वास कसा आला, याचा शोध घेतला जात आहे, असे महेश नगर पोलीस स्टेशनच्या एसएचओ कविता शर्मा यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List