मुंबईत हे काय घडतंय? बस चालवण्याआधी ड्रायव्हर थेट दारूच्या गुत्यात, सीसीटीव्हीतून धक्कादायक माहिती उघड

कुर्ला पश्चिमेकडे सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 45 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मुंबईतील विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून जखमींपैकी काहीची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातास जबाबदार ठरलेला ड्रायव्हर संज मोरे याला पोलिसांनी अटक करत न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. दरम्यान पोलीस तपासात अनेक खुलासे झाले असून ड्रायव्हरला इलेक्ट्रॉनिक बस चालवण्याचा फारसा अनुभव नव्हता, तो 1 डिसेंबरपासूनच ड्युटीवर रुजू होऊन ही बस चालवत होता, असेही तपासात समोर आले आहे.

एका ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे 7 जणांचा जीव गेलेल्या या दुर्घटनेमुळे राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना अद्याप ताजी असतानाच मुंबईतून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कुर्ला बस अपघातानंतर आणखी एका बेस्ट चालकाचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यात तो चक्क दारूच्या दुकानातून दारूची बाटली घेऊन बसमध्ये घेऊन जात असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अंधेरी पश्चिम येथील हा व्हिडीओ समोर आल्याने खळबळ माजली आहे.

काय आहे त्या व्हायरल व्हिडीओमध्ये ?

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पश्चिमेकडील एक व्हिडीओ व्हायरल झालाय. BEST बसचा एक ड्रायव्हर अंधेरी पश्चिमेकडील लोटस वाईन शॉपमध्ये दारू खरेदी करण्यास गेल्याचे त्यात दिसत आहे. त्या ड्रायव्हरने दारूच्या दुकानातून दारूची बाटली विकत घेतली आणि तो तीच बाटली घेऊन बसमध्ये चढला. एवढंच नव्हे तर दारू खरेदी करण्यासाठी त्याने प्रवाशांनी खचाखच भरलेली अख्खी बसंच वाईन शॉपच्या जवळ उभी केली होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बीएसटी बस चालकांवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येत असून या अशा चालकांवर कारवाई कधी होणार असा प्रश्नही विचारला जात आहे. मनसेनेही याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे.

खारमध्येही बेस्ट चालकाने विकत घेतलं मद्य

अंधेरीप्रमाणेच खारमध्येही असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. अंधेरी पश्चिमेकडे वाईन शॉपजवळ बस थांबवून ड्रायव्हरने खाल उतरून मद्य विकत घेतल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून आता खारमध्येही याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली आहे. बेस्ट बसचा ड्युटीवर असलेला, गणवेश घातलेला ड्रायव्हर मद्य विकत घेतल्याचा व्हिडीओ समोर आलाय. त्याने ऑन ड्युटी असतानाही बांद्रा येथे दुकानातून मद्याची बाटली विकत घेतली.त्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्याला रोखून जाब विचारला असता, ड्रायव्हरने थेट उडवाउडवीची उत्तर दिली. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून लोकांचा जीव धोक्यात घालण्याचा अधिकार यांना कोणी दिला असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अर्जुनने सर्वांसमोर म्हटलं ‘मी सिंगल’; ऐकून मलायकाचा राग अनावर, म्हणाली “प्रत्येक ठिकाणी..” अर्जुनने सर्वांसमोर म्हटलं ‘मी सिंगल’; ऐकून मलायकाचा राग अनावर, म्हणाली “प्रत्येक ठिकाणी..”
जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी ब्रेकअप केला. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या लोकप्रिय जोड्यांपैकी ही...
फ्लाइंग किस, मेरी ख्रिसमस अन् Hi…; रणबीर-आलियाच्या लेकीने जिंकली नेटकऱ्यांची मनं
Actors Who Were Arrested in 2024 : कुणावर बलात्काराचा, तर कुणावर हत्येचा आरोप; 2024 मध्ये ‘या’ अभिनेत्यांना झाली अटक
पालिकेकडे 20 ट्रक केबलचा खच! ओव्हरहेड केबलचे करायचे काय ?
संकटांवर मात करीत कणदूरला गुऱ्हाळ उद्योग सुरु
नोटीस बजावूनही ठेकेदारांनी सादर केले अपुरे रेकॉर्ड, मोठा घोटाळा झाल्याचा ‘आप’चा आरोप
वसईच्या लाचखोर वनक्षेत्रपालच्या घरात मोठे घबाड; घराच्या झडतीत 57 तोळे सोने, 1 कोटी 31 लाखांची रोकड जप्त