सलमान खानच्या आईने वाढदिवसाच्या पार्टीत सवत हेलनसोबत केला डान्स; व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमान खानने नुकताच त्याची आई सलमा खान यांचा 83 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त खान कुटुंबीयांनी छोट्याशा पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीतील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. हा व्हिडीओ सलमानची आई सलमा आणि सावत्र आई हेलन यांचा आहे. वाढदिवसाच्या पार्टीत दोघींनी एकत्र डान्स केल्याचं पहायला मिळतंय. सलमा आणि हेलन यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोंमध्ये पहायला मिळतंय की सलमा खान यांच्या वाढदिवसानिमित्त दमदार पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्टीत त्यांच्या मुली अलविरा आणि अर्पिता यांच्यासोबतच मुलगा सोहैल खान, नातवंडं हे सर्वजण पोहोचले आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये सलमा खान हे सलीम खान यांच्या दुसऱ्या पत्नी हेलन यांचा हात हातात घेऊन डान्सिंग क्वीन गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. या दोघांमधील मैत्रीपूर्ण नात्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
दुसऱ्या व्हिडीओमध्ये सोहैल खान त्याच्या आईसोबत नाचताना दिसून येत आहे. तर आणखी एका व्हिडीओमध्ये सलमान त्याच्या आईवर प्रेमाचा वर्षाव करताना पहायला मिळत आहे. सलमा खान या केक कापताना सर्वजण ‘बार बार दिन ये आए’ हे गाणं गाताना दिसत आहे. सलमाननेही त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आईसोबतचा व्हिडीओ पोस्ट करत लिहिलं, ‘मम्मी, जन्मदिवसाच्या शुभेच्छा.. मदर इंडिया.. आमचं विश्व.’
सलीम खान यांच्याशी लग्नाआधी सलमा यांचं नाव सुशीला होतं. त्या हिंदू कुटुंबातील होत्या. मात्र नंतर त्यांनी नाव बदललं. 1964 मध्ये सलीम खान आणि सलमा यांचं लग्न झालं होतं. त्यानंतर 1981 मध्ये त्यांनी हेलन यांच्याशी दुसरं लग्न केलं. आजही सलीम खान, सलमा, हेलन आणि अभिनेता सलमान खान हे मुंबईतील वांद्रे इथल्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’मध्ये एकत्र राहतात. सलीम आणि हेलन यांनी अर्पिताला दत्तक घेतलं. तिने आयुष शर्माशी लग्न केलं असून आयुषसुद्धा चित्रपटसृष्टीत काम करतोय.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List