नोकरीचा पहिला दिवस भरुन घरी परतण्यासाठी निघाली अन्… कुर्ल्यातील बस अपघातात 19 वर्षीय तरुणीचा करुण अंत

नोकरीचा पहिला दिवस भरुन घरी परतण्यासाठी निघाली अन्… कुर्ल्यातील बस अपघातात 19 वर्षीय तरुणीचा करुण अंत

Kurla Bus Accident : कुर्ला पश्चिमेला सोमवारी रात्री झालेल्या अपघातामुळे संपूर्ण मुंबई हादरली. कुर्ल्यात भरधाव वेगाने आलेल्या एका बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने अनेक वाहनांना धडक देत नागरिकांना चिरडलं. या अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला. तर 43 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील जखमींवर भाभा रुग्णालय, सायन रुग्णालय यांसह काही खासगी रुग्णालयातही उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये १९ वर्षीय आफरीन शाह या तरुणीचाही समावेश आहे. आफरीनच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

कुर्ल्यात झालेल्या बेस्ट बस अपघातात एका 19 वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागला. विशेष म्हणजे तिच्या आयुष्यातील पहिल्या नोकरीचा पहिला दिवस तिच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला. आफरीन शाह असे या तरुणीचे नाव आहे. कुर्ल्यातील भाभा रुग्णालयाने तिला मृत घोषित केले.

कुर्ल्यात राहणारी १९ वर्षीय आफरीन शाहच्या नोकरीचा काल पहिला दिवस होता. डोळ्यात मोठी स्वप्न घेऊन ती तिच्या नोकरीसाठी गेली. तिने नोकरीचा पहिला दिवस भरला. यानंतर तो आटोपून तो घरी परतण्यास निघाली. मात्र तोच काळाने तिच्यावर घाला घातला. तिच्या नोकरीचा पहिला दिवसच तिच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला.

नेमकं काय घडलं?

आफरीन घरी परतण्यास निघाली. त्यानंतर ती कुर्ला स्थानकात उतरली. तिथे उतरुन तिने तिचे वडील अब्दुल सलीम यांना फोन केला. तिने वडिलांना स्टेशनला घ्यायला या, असे सांगितले. त्यावेळी तिच्या वडिलांनी तू कुर्ला स्थानकातून चालत थोडं पुढे ये, असे सांगितले. वडिलांनी सांगितल्यानुसार ती कुर्ला स्थानकातून बाहेर आली. त्यानंतर ती चालत होती. याचदरम्यान मागून येणाऱ्या भरधाव बसने तिला उडवले. यानंतर आफरिनला तात्काळ भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याआधीच तिचा मृत्यू झाला.

आफ्रिनचे वडील तिला घरी आणण्यासाठी निघाले होते. पण त्यांना मुलीचा मृतदेह घेण्यासाठी रुग्णालयात जावे लागले. या दुर्घटनेनंतर आफ्रिनच्या वडिलांनी आरोपी बस चालकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

कुर्ला बस अपघातात 7 जणांचा मृत्यू

सोमवारी रात्री 9.50 च्या सुमारास कुर्ला पश्चिमेकडील अंजुम-ए-इस्लाम शाळेजवळील एसजी बारवे रोडवर एक बस सुसाट वेगाने आले. यानंतर भरधाव वेगाने येणारी अनियंत्रित बस गर्दीत घुसली आणि ते पाहून लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. यावेळी अनियंत्रित झालेल्या भरधाव वेगाने आलेल्या बसने 30-40 गाड्यांना जोरदार धडक दिली. यावेळी रिक्षा, दुचाकी तसेच रस्त्यावर अनेक नागरिकांना या बसने चिरडले. त्यामुळे काही नागरिक जखमी झाले. तर काहींना यात जीव गमवावा लागला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

31 डिसेंबरला शिर्डी साई मंदिर रात्रभर खुले 31 डिसेंबरला शिर्डी साई मंदिर रात्रभर खुले
नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 डिसेंबरला शिर्डीतील साईबाबांचे मंदिर रात्रभर उघडे ठेववण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. देशातील कोट्य़वधी भक्तांचे श्रद्धास्थान...
श्री विठ्ठल मंदिरातील पितळी दरवाजाला चांदीची झळाळी
राज्यातील मंदिरांमध्ये आठवडय़ातून एकदा होणार महाआरती; शिर्डीतील मंदिर न्याय परिषदेत ठराव
खंडाळ्यात खोळंबा; नाताळच्या सुट्टीचे ‘बारा’ वाजले
हिंगोली हादरले – एसआरपी जवानाचा कुटुंबावर बेछूट गोळीबार, पत्नीचा मृत्यू, चिमुकल्यासह दोघे गंभीर; आरोपी फरार
झेलेन्स्की म्हणाले, याहून अमानवी काहीच असू शकत नाही; ख्रिसमसच्या दिवशी रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला
‘इस्रो’ची धमाकेदार वर्षअखेर, स्पॅडेक्स 30 डिसेंबरला लाँच होणार