गुजरातसाठी काम करणाऱ्यांना घरी बसवा, सय्यद नासीर हुसेन यांचे आवाहन

गुजरातसाठी काम करणाऱ्यांना घरी बसवा, सय्यद नासीर हुसेन यांचे आवाहन

महाभ्रष्ट्र भाजपा सरकारच्या काळात गुजरातच्या ठेकेदारांना मोठमोठी कामे दिली गेली. टाटा एअरबस, वेदांता फॉक्सकॉन, हिरे उद्योग, बल्क ड्रग्ज पार्कसारखे महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातला पाठवून येथील रोजगार पळवले. दुसरीकडे, गुजरातमधून मोठय़ा प्रमाणात ड्रग्ज महाराष्ट्रात आणून तरुण पिढी बरबाद करण्याचे पाप भाजपा युती सरकारने केले, असा हल्लाबोल करत शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्रासाठी नाही तर गुजरातसाठी काम करतेय. त्यामुळे नागरिकांनी महाराष्ट्रासाठी काम करणाऱया महाविकास आघाडीलाच निवडून द्यावे, असे आवाहन काँग्रेस वार्ंकग कमिटीचे सदस्य व विधानसभा निवडणुकीसाठी उत्तर महाराष्ट्राचे वरिष्ठ निरीक्षक खासदार सय्यद नासीर हुसेन यांनी केले.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत डॉ. नासीर हुसेन म्हणाले, भाजपा युती सरकार हे भ्रष्ट व घोटाळेबाज सरकार आहे. 40 टक्के कमिशनवाल्या या सरकारने 10 हजार कोटींचा जलयुक्त शिवार घोटाळा, 8 हजार कोटी रुपयांचा रुग्णवाहिका घोटाळा, 6 हजार कोटींचा मुंबईतील रस्ते घोटाळा असे अनेक घोटाळे या सरकारने केले. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपाला ज्या कंपन्यांनी मोठय़ा देणग्या दिल्या त्या कंपन्यांना महाराष्ट्रातील मोठय़ा प्रकल्पांचे काम दिले. अजित पवार, रवींद्र वायकर, अशोक चव्हाण यांच्यावर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी घोटाळ्याचे आरोप केले व त्यांना भाजपात घेतल्यावर आता मात्र ते यावर काहीच बोलत नाहीत, यावर भाजपाने उत्तर दिले पाहिजे.

भाजपाने ईडी, सीबीआयचा धाक दाखवून आमदार फोडून विरोधी पक्षांची सरकारे पाडली. ते जनतेला अजिबात आवडले नाही. कर्नाटकात जनतेने भाजपाला धडा शिकवत काँग्रेसचे बहुमताचे सरकार आणले. तशाच पद्धतीने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणाऱया भाजपाला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही डॉ. हुसेन यांनी दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विरार कॅश कांड प्रकरणावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, हॉटेलमध्ये नेमकं काय झालं? सगळं सांगितलं! विरार कॅश कांड प्रकरणावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, हॉटेलमध्ये नेमकं काय झालं? सगळं सांगितलं!
भाजप नेते विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आला होता. यावरून आज विरार पूर्वेच्या मनवेलपाडा...
दिग्दर्शकावर गोळीबार केल्याप्रकरणी टीव्ही अभिनेत्याला अटक, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
विरारमध्ये पुन्हा तेच! तावडेंनंतर मिंधे गटाच्या कार्यकर्त्याला पैसे वाटप करताना पकडले, धूधू धुतले
उद्धव ठाकरे यांच्याबाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या नितेश राणे यांच्यावर कठोर कारवाई करा, शिवसेनेचे निवडणूक आयोगाला पत्र
विरारमध्ये वाटपासाठी 5 कोटी आले होते, त्यातील फक्त 9 लाख दाखवले आणि इतर रक्कम गायब केली; हितेंद्र ठाकूर यांचा आरोप
पाकिस्तानात खेळाडू थांबलेल्या हॉटेलमध्ये आग, Champions Trophy चे यजमानपद धोक्यात; ICC काय निर्णय घेणार?
एका केळ्याची किंमत तब्बल 8 कोटी रुपये? नेमके कारण तरी काय…