Voter ID विसरलात? चिंता कशाला करता, या ओळखपत्रांआधारे करा की मतदान, कोणी नाही थांबवणार

Voter ID विसरलात? चिंता कशाला करता, या ओळखपत्रांआधारे करा की मतदान, कोणी नाही थांबवणार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उद्या, 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होत आहे. यावेळी महाविकास आघाडी, महायुती, तिसरी आघाडी, वंचित, बंडखोर, अपक्ष अशी लांबलचक यादी आहे. तुमच्या मनातील कौल उद्या मतपेटीत बंद होणार आहे. पण मतदानाच्या दिवशी नेमकं मतदान कार्ड गायब होतं. ते ठेवलेले असते एकीकडे आणि आपण शोधतो दुसरीकडे. मतदान ओळखपत्र सापडले नाही तर मतदान कसे करणार असा प्रश्न काहींना पडतो. तेव्हा काळजी करायची गरज नाही. या 12 ओळखपत्रांआधारे तुम्ही मतदानाचा हक्क बजावू शकता.

या 12 पैकी हवा एक पुरावा

मतदान ओळखपत्र जवळ नसल्यास कोणताही एक मूळ पुरावा तुम्हाला मतदान केंद्रावर दाखवावा लागेल. त्यावेळी संबंधितांना मतदानाचा हक्क बजावता येईल. पण मतदारांना मतदान केंद्रावर मोबाईल नेता येणार नाही. त्यांना मोबाईलमधील ओळखपत्र दाखवता येणार नाही.

मतदाराची ओळख पटवण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या 12 पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरावा लागणार आहे. आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, टपाल खात्याचे पासबुक, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीचे स्मार्ट कार्ड, भारतीय पारपत्र-पासपोर्ट, निवृत्ती वेतन कागदपत्र, सरकारी कर्मचाऱ्यांना सेवा ओळखपत्र, खासदार, आमदारांना देण्यात आलेले ओळखपत्र, दिव्यांगाना देण्यात आलेले ओळखपत्र या आधारे मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल.

नो मोबाईल प्लीज

मतदान करताना व्हिडिओ काढणे, छायाचित्र काढण्याचा अनेकांचा मोह होतो. पण विधानसभा निवडणुकीच्या मतदानावेळी मोबाईलचा वापर करता येणार नाही. मतदान केंद्राच्या 100 मीटर परीसरात तर मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी आहे. मतदानावेळी मतदान केंद्रात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. मतदानाची गोपनियता भंग होऊ नये यासाठी मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी आहे. याविषयीच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित मतदारावर भारतीय न्याय संहितेनुसार कारवाई करण्यात येईल.

त्यामुळे राष्ट्रीय कर्तव्य बजावताना गोपनियतेचा भंग होणार नाही. आयोगाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या. नसता तुमचा सोशल मीडियावरील उत्साह तुम्हाला महागात पडेल. मतदान करताना ओळखपत्र सोबत न्यावे लागेल. मतदान ओळखपत्र नसले तरी इतर उल्लेखित ओळखपत्रांपैकी एक तरी तुमच्या जवळ असणे अनिवार्य आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबई ते नवी मुंबई विमानतळ 17 मिनिटांत गाठता येणार, नितीन गडकरी यांचा नवीन प्रोजेक्ट काय? मुंबई ते नवी मुंबई विमानतळ 17 मिनिटांत गाठता येणार, नितीन गडकरी यांचा नवीन प्रोजेक्ट काय?
Mumbai’s transportation network: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी देशातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल घडवून आणत आहे. काळानुसार...
दिल्लीत श्वास कोंडला, मुंबईची हवा बिघडली, AQI किती?
Voter ID विसरलात? चिंता कशाला करता, या ओळखपत्रांआधारे करा की मतदान, कोणी नाही थांबवणार
शिल्पा शेट्टीने स्वतःचा संसार थाटला आणि माझा मोडला…, सवतीचं शिल्पा शेट्टीला पत्र
सुष्मिता सेनची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? अभिनेत्रीच्या वडिलांचा मोठा निर्णय
Kantara 2 Teaser: हातात त्रिशूळ, रक्ताने माखलेलं शरीर.. ‘कांतारा 2’चा टीझर पाहून अंगावर येईल काटा!
‘पुष्पा 2’च्या ट्रेलरमध्ये दिसलेला भयानक पुरुष कोण? श्रीवल्लीच्या हत्येशी कनेक्शन?