हाडांच्या मजबूतीसाठी रोज खा हे 3 पदार्थ, कॅल्शियमची भासणार नाही उणीव
वाढते प्रदुषण, कुपोषण आणि बैठ्या जीवनशैलीमुळे कमी वयात अनेक व्याधी जडत आहेत. त्यामुळे हाडे कमजोर होण्याचे आणि सांधे दुखण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हाडांची मजबूत गरजेची बनली आहे. वाढत्या वया बरोबर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे सांधेदुखीचे प्रमाण वाढलेले आहे. अनेकदा ऑस्टिओआर्थरायटिस किंवा ऑस्टियोपोरोसिसची समस्या वाढू शकते. अशात काही पदार्थांचा आपल्या आहारात समावेश केला तर आपली हाडे दुप्पट मजबूत होतील आणि अनेक त्रासातून आपली सूटका होऊ शकेल. चला तर पाहूयात कोणते हे पदार्थ आहेत…
नाचणी
नाचणी हे भरड धान्य कोकणात आणि गुजरातच्या डांग जिल्ह्यात खूप पिकते. नाचणीला परदेशातही मागणी वाढली आहे. कारण अन्य धान्याच्या तुलनेत नाचणीत पोषक तत्वं भरपूर आहेत. नाचणी कॅल्शियमचे प्रमाण जादा आहे. हाडे मजबूत करण्यासाठी नाचणीचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.नाचणी हे एंटी-ऑक्सिडेंट आणि एंटी-इंफ्लेमेटरी गुणांनी परिपूर्ण आहे.शरीरात आलेली सूज असो की सांधेदुखील यास कमी करण्याची ताकद नाचणीत आहे. जर तुम्ही हाडांच्या कमजोरी आणि दुखण्याने ग्रस्त आहात तर नाचणीच्या भाकऱ्या किंवा पराठे करुन खाऊ शकता.
सीड्स आणि नट्स
सीड्स आणि ड्रायफ्रुट्स हे पोषक तत्वांनी भरपूर असते. त्यांच्या सेवनाने हाडे देखील मजबूत होतात. सांधे दुखीवर देखील ड्रायफ्रुट्स हे गुणकारी असतात. कारण यात ओमेगा-3 फॅटी एसिड असते.हे सुजेवर रामबाण औषध आहे. संधीवाताला कमी करण्यासाठी हे मदत करते. याचे दररोज सेवन केल्यास तर आपल्या सांधे दुखी आणि कंबर दुखीवर आराम मिळेल.
अननस
हाडांना मजबूत करण्यासाठी अननस फळ फायदेशीर आहे. हे फळ विटामिन्स आणि फायबरने परिपूर्ण असते. शरीरातील सूज आणि सांधे दुखी कमी करण्यासाठी अननस हे फळ फायदेशीर आहे.अननसमध्ये विटामिन्स ‘सी’चे प्रमाण भरपूर असते. हाडांच्या मजबूतीसाठी ते चांगले असते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List