आदर्श कुटुंब कसं असावं? समंथाच्या पूर्व पतीने मांडलेलं मत चर्चेत

आदर्श कुटुंब कसं असावं? समंथाच्या पूर्व पतीने मांडलेलं मत चर्चेत

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्य आणि अभिनेत्री सोभिता धुलिपाला लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या दोघांचा साखरपुडा पार पडला. नाग चैतन्यचं हे दुसरं लग्न असून याआधी त्याने अभिनेत्री समंथा रुथ प्रभूशी लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नाच्या चार वर्षांतच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. समंथाला घटस्फोट दिल्यानंतर नाग चैतन्यचं नाव सोभिताशी जोडलं गेलं होतं. आता नुकत्यात दिलेल्या एका मुलाखतीत नाग चैतन्य त्याच्या दुसऱ्या लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. “तुझ्या मते आदर्श कुटुंब कसं असेल”, असा प्रश्न त्याला या मुलाखतीत विचारण्यात आला. नाग चैतन्यनने अभिनेता राणा डग्गुबत्तीच्या ‘द राणा डग्गुबत्ती शो’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी दोघांनी विविध विषयांवर गप्पा मारल्या. सोशल मीडियावर या एपिसोडचा प्रोमो व्हायरल होत आहे.

नाग चैतन्यला राणा विचारतो, “तुझं कुटुंब कसं असेल, याबद्दल तुझी काय कल्पना आहे?” त्यावर उत्तर देताना नाग चैतन्य म्हणतो, “सुखी वैवाहिक आयुष्य आणि काही मुलं.” हे ऐकल्यानंतर राणा मस्करीत त्याला म्हणतो, “काही मुलं म्हणजे वेंकी काकांसारखी चार की दोन मुलं?” त्यावर नाग चैतन्य हसत सांगतो, “वेंकी काकांसारखी नकोत.” वेंकी काका म्हणजेच दाक्षिणात्य अभिनेते व्यंकटेश. ते राणा आणि नाग चैतन्य यांचे काका असून त्यांना चार मुलं आहेत.

‘द राणा डग्गबत्ती शो’ येत्या 23 नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून पहिल्या सिझनमध्ये आठ एपिसोड्स पहायला मिळतील. प्रत्येक शनिवारी एक एपिसोड प्रसारित होईल. राणाच्या या टॉक शोमध्ये आतापर्यंत अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी हजेरी लावली होती. यात नाग चैतन्यशिवाय दलकर सलमान, एस. एस. राजामौली, नानी, राम गोपाल वर्मा, श्रीलीला, ऋषभ शेट्टी, तेजा सज्जा यांचा समावेश आहे. इतकंच नव्हे तर एका एपिसोडमध्ये राणाची पत्नी मिहीकासुद्धा पाहुणी म्हणून उपस्थित राहील.

याआधी दिलेल्या एका मुलाखतीत सोभितासुद्धा आई होण्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली होती. “साखरपुड्याबाबत माझ्या फारशा अपेक्षा किंवा स्वप्न नव्हती. मला फक्त त्या क्षणांचा आनंद घ्यायचा होता. तो अनुभव अत्यंत साधा आणि तितकाच खास होता. मी जसा विचार केला होता तसंच सगळं पार पडलं होतं. जेव्हा गोष्टीच इतक्या सुंदर घडत असतील, तेव्हा त्यात आणखी काही भरजरीची गरज नसते. ते क्षण तुमच्यासाठी पुरेसे ठरतात. ते सर्वकाही परफेक्ट होतं. मातृत्वाचा अनुभव घेण्याबद्दल मी नेहमीच सकारात्मक होते. याबाबतीत मी खूप स्पष्ट आहे. लग्नाबाबतही मी नेहमीच सकारात्मक होती”, असं ती म्हणाली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीलाच पोस्टर वॉर; शिंदे सेना, उद्धव सेनेचा एकमेकांवर प्रहार बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीलाच पोस्टर वॉर; शिंदे सेना, उद्धव सेनेचा एकमेकांवर प्रहार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा उद्या 18 नोव्हेंबर रोजी थंडावतील. निवडणूक प्रचारातील अंतिम टप्प्यात आज शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे...
Sharad Pawar : शरद पवारांना सतावतेय ही चिंता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आवाहन, म्हणाले आमच्या जागा तरी वाढतील
बाळासाहेब ठाकरेंचं उदाहरण देत संजय राऊतांचा शिंदेवर निशाणा, फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, दिल्लीचे बूट…
“एक पार्टी 1500 देतेय दुसरी 3000…”, ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाले “पैसे कुठून…”
WWE मध्ये एण्ट्री पक्की..; वाढलेल्या वजनामुळे तमन्ना भाटिया ट्रोल
‘तुझा अहंकार..’; नयताराने धनुषला खुलं पत्र लिहित सुनावलं, नेमकं काय आहे प्रकरण?
आधी टिकली लाव मग मी बोलेन..; संभाजी भिंडेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचं वेगळं मत चर्चेत