जिथे निवडणुका तिथे मोदी, पंतप्रधान प्रचारात गुंतल्यास देश कसा चालणार? संजय राऊत यांचा रोखठोक सवाल
जिथे निवडणुका तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, निवडणुका तिथे मोदी, शहा आणि सर्व केंद्र सरकार असे समीकरण गेल्या 10 वर्षांपासून बनले आहे. मणीपूर, जम्मू कश्मीर अशी संकटे असलेल्या ठिकाणी मोदी कधीही दिसत नाहीत. संकटे असलेल्या ठिकाणी किंव गरज असलेल्या ठिकाणी पंतप्रधान पोहचले नाहीत तर देश कसा चालणार? असा रोखठोक सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी केद्र सरकारच महाराष्ट्रात उतरले आहे. नरेंद्र मोदींच्या 15 सभा राज्यात होणार आहेत, देशाच्या गृहमंत्र्यांच्या सुमारे 30 सभा आहेत. केंद्रीय मंत्री, गुजरातचे आमदार नेहमीप्रमाणे राज्यात घुसले आहेत. दिल्लीच्या सराकारने टाळेंबदी करत ते महाराष्ट्रात आले आहे. अशा परिस्थितीत देश कसा चालणार, देशावर काही संकट आले तर काय होणार, देशावर चार बाजूंनी संकटे दिसत आहेत, असेही त्यांनी सांगितले. जिथे निवडणुका तिथे मोदी, असे समीकरण बनले आहे, जिथे संकटे असतात, जिथे पंतप्रधानांची गरज असते, तिथे मोदी कधीही नसतात, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
अनेक प्रकल्प गुजरातले पळवून नेले. महाराष्ट्राचे हक्काचे ओरबाडायचे आणि इथे येत महाराष्ट्राच्या तोंडावर काहीतरी फेकून जायचे, असे त्यांचे सुरू आहे. महाराष्ट्र भिकारी आहे काय, महाराष्ट्र त्यांच्या भिकेवर जगत नाही. महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याबाबातही आक्षेपार्ह विधाने केली आहेत. अरविंद सावंत जबाबदार नेते आहेत. भाजपच्या उमेदवार मुंबईच्या नाहीत. त्या बाहेरून आयात केलेल्या आहेत. त्यासंदर्भात अरविंद सावंत यांनी बाहेरून आलेला व्यक्ती, आयात केलेल्या उमेदवार असे म्हणाले, त्यात अयोग्य काय आहे, सावंत यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List