Sharad Pawar Interview: ”अनेक बैठका झाल्या…”, अदानी यांच्या घरी झालेल्या बैठकीत काय झाले? अखेर शरद पवार यांनी सांगितले
Sharad Pawar Interview: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे मतदान आता पाच दिवसांवर आले आहे. या मतदानापूर्वी राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. 2019 मध्ये भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक गौतम अदाणी यांच्या घरी झाली होती, असे अजित पवार यांनी म्हटले होते. त्या बैठकीसंदर्भात आता शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘टीव्ही ९ मराठीचे’ मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी त्यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीत त्यांनी हे स्पष्टीकरण दिले.
काय म्हणाले शरद पवार
अदानी यांच्यासोबत बैठक झाली का? त्यावर शरद पवार म्हणाले, माझ्या अनेक बैठका झाल्या आहेत. अदानींसोबत झाल्या असतील किंवा अनेक उद्योगपतीसोबत झाल्या असतील. मी नेहमी सर्वांशी सुसंवाद साधत असतो. आपली आणि त्यांची मतभिन्नता असली तर मते समजून घेत असतो. मी वेगवेगळ्या लोकांसोबत बसतो. उद्योजक, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांशी चर्चा करत असतो. कारण आपण सर्व गोष्टींचे तज्ज्ञ असू शकत नाही. त्यामुळे त्या, त्या क्षेत्रातील लोकांशी माझ्या चर्चा सुरु असतात. कारण आपण सर्व गोष्टी समजून घ्यायला पाहिजे.
मी संरक्षण मंत्री होतो. त्यावेळी मला सैन्यदलाच्या रँक्स माहीत नव्हत्या. मग मी तातडीने कोल्हापूरला गेलो. त्या ठिकाणी भारतीय लष्करातून निवृत्त झालेले जनरल थोरात होते. त्यांची भेट घेतली. दोन दिवस त्यांना भेटून एका विद्यार्थ्यासारखे त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. संरक्षण मंत्री म्हणून मी त्यांचा बॉस होतो. पण संरक्षण क्षेत्रातील त्यांचे ज्ञान माझ्यापेक्षा जास्त होते. त्यांचा अनुभव चांगला होता. मला कमीपणा वाटला नाही. मी संरक्षण मंत्री होतो आणि ते अधिकारी त्यांच्या घरी जाणे हा कमीपणा वाटले नाही. कारण विषयचे ज्ञान समजून घेतले पाहिजे.
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होती की, शरद पवार यांनी सांगितल्यावर राष्ट्रपती राजवट उठली, त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, मी देवेंद्र फडणवीस यांचा आभारी आहे. कारण २०१९ मध्ये मी सत्तेत नव्हतो. माझ्याकडे कोणताही अधिकारी नव्हता. त्यानंतरही मी सांगितल्यावर राष्ट्रपती राजवट काढली जाते. त्यामुळे त्यांनी समजले पाहिजे माझे स्थान काय आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List