अजित पवारांच्या मनात नेमकं काय? आधी शाह, आता पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील सभेला दांडी, राष्ट्रवादीचे नेतेही गैरहजर

अजित पवारांच्या मनात नेमकं काय? आधी शाह, आता पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील सभेला दांडी, राष्ट्रवादीचे नेतेही गैरहजर

PM Narendra Modi Mumbai Rally : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका पार पडत आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यातच काल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शेवटची सभा मुंबईत पार पडली. मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे सभा घेतली. मात्र या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर होते. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठीची शेवटची सभा पार पडली. मुंबईतील दादर परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कजवळ ही सभा पार पडली. या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर निशाणा साधला. महाविकास आघाडीवाले जातीच्या नावावर लोकांना लढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या राजकारणापासून सावध राहा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईकरांना केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचाराच्या शेवटच्या सभेसाठी महायुतीच्या घटक पक्षातील सर्व नेते उपस्थित होते. मात्र यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांनी दांडी मारली. नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचे इतर ज्येष्ठ नेते यात सहभागी झाले नाहीत. तसेच राष्ट्रवादीचे मुंबईतील उमेदवार सना मलिक, नवाब मलिक आणि झिशान सिद्दीकी हे देखील अनुपस्थितीत होते. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे. या सभेसाठी शिवसेना (शिंदे गट) आणि रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील आरपीआयसह महायुतीचे सर्व उमेदवार उपस्थितीत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

“विधानसभा निवडणुकीसाठी ही माझी शेवटची सभा आहे. निवडणुकीदरम्यान मी सगळ्या महाराष्ट्राचा दौरा केला. प्रत्येक भागातल्या लोकांशी माझं बोलणं झालं आणि आता मी आमच्या मुंबईमध्ये आहे. सगळ्या महाराष्ट्राचा आशीर्वाद महायुती सोबत आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचं कर्तव्य असतं की देशाला आपल्या पक्षापेक्षा वर ठेवावे. भाजपचे महायुतीची हीच नीती आहे पण महाविकास आघाडीवाल्यांसाठी देशाच्या वर त्यांचा पक्ष आहे. देश पुढे जातो तेव्हा महाविकास आघाडीला दुःख होतं. भारताच्या प्रत्येक यशावर आघाडीवाले प्रश्न उपस्थित करतात. याच लोकांनी अनेक वर्षे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला नाही. त्यामुळे तुम्हाला महाविकास आघाडीच्या राजकारणापासून सावध राहायचं आहे,” असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येणार का? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट संकेत देत सांगितले, राजकारणात… उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येणार का? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट संकेत देत सांगितले, राजकारणात…
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्याचबरोबर निवडणुकीनंतरचे समीकरण कसे असणार? त्यावर चर्चा होत...
“छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरे बांधण्यापेक्षा…”, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सुनावले
“महिला, रोजगार आणि…”, मनसेच्या जाहीरनाम्यातील 10 प्रमुख मुद्दे काय?
मृणाल दुसानिसचं 4 वर्षांनंतर मालिकेत पुनरागमन; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये कलाकारांची फौज
सोशल मीडियाची ताकद; व्हायरल चहावाल्याचं पालटलं नशीब, शार्क टँकमध्ये मिळाली मोठी ऑफर
पलक तिवारी होणार सैफ अली खानची सून? इब्राहिमबद्दल म्हणाली, ‘मला तो आवडतो आणि…’
सुबोध भावे-तेजश्री प्रधानची केमिस्ट्री जुळणार? ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला