अमित ठाकरे यांना का मतदान करावं? मराठी अभिनेत्याने दिली 10 कारणं

अमित ठाकरे यांना का मतदान करावं?  मराठी अभिनेत्याने दिली 10 कारणं

राज्यात सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. विधानसभा निवडणुकीत रणधुमाळी माजली आहे. प्रचारांच्या तोफा धडाडल्या आहेत. एकमेकांवर वैखरी टीका सुरू आहे. अशात सेलिब्रिटी देखील त्यांच्या आवडत्या उमेदवारासाठी प्रचार करताना दिसत आहेत. सध्या कलाकारांची सोशल मीडिया पोस्ट आणि राजकीय मंचावरील भाषणं चर्चेचा विषय ठरत आहेत. अनेक सेलिब्रिटी प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठीदेखील अनेक कलाकार पुढे आले आहेत. यंदाच्या निवडणुकीत मनसेचे 135 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.
मुंबईतील माहीम मतदारसंघात स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अमित ठाकरे यांच्यासाठी ज्येष्ठ अभिनेते संजय मोने यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. पोस्ट करत संजय मोने यांनी अमित ठाकरे यांना का मतदार करावं…. याची एक दोन नाही तर 10 कारणं दिली आहे. सध्या संजय मोने यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

संजय मोने यांची फेसबुक पोस्ट

माझी सर्व कलाकारांना विनंती आहे… तुमचे विचार समाज ऐकतो, तुमची वाह वाह करतो. याचा अर्थ असा नाही कि तुम्ही म्हणाल ते सगळे लोक ऐकतील.आपल्या कलाकारांना समाज फक्त आणि फक्त एक मनोरंजन करणारी व्यक्ती म्हणून ओळखतो. तुम्ही गंभीर भूमिका करा किंवा विनोदी भूमिका करा तुम्ही फक्त काही क्षणांचं, त्यांचं वेळ घालवायचं एक खेळणं असता. कधीही तुमच्या खांद्यावर हात टाकून एक सेल्फी घेण्याइतकीच तुमची किंमत असते. तेव्हा या निवडणुकीसाठी उगाच प्रचार करून आपण परिस्थिती बदलू शकतो या भ्रमात राहू नका.आपला आत्म सन्मान विकू नका.कारण निवडणुका झाल्यानंतर तुम्हाला कोणीही हिंग लावून विचारणार नाही.(हिंग लावून विचारणं हि एक म्हण झाली.प्रत्यक्षात हिंग महाग असतो)तेंव्हा या वेळी पक्ष नाही तर व्यक्तीला मतदान करा.

आता माझ्या माहीम मतदार संघाबद्दल. इथे बरेच उमेदवार आहेत. त्यातले बरेच विविध पक्षांची सफर करून आले आहेत. त्यांना स्वतःला तरी त्यांचा मूळ पक्ष आठवत असेल का?निशाणी म्हणजे पक्ष नाही.

माझ्या मतदार संघात श्री.अमित ठाकरे उमेदवार आहेत. त्यांना मत का द्यायचं? याची कारणं मला सांगावीशी वाटतात.

१) ते आधीपासून त्याच पक्षाशी निगडीत आहेत.

२) त्यांचा या मतदार संघाशी जन्मापासून संबंध आहे.

३) तरुण आहेत त्यामुळे नव्या पिढीचे जे काही प्रश्न आहेत किंवा ज्या काही समस्या आहेत त्याबद्दल त्यांना चांगली माहिती आहे.

४) निवडून आल्यानंतर काही काम करण्याची वेळ येईल तेंव्हा समोर आलेला प्रश्न मराठी,हिंदी (ही लादली गेलेली भाषा आहे )किंवा इंग्रजी (ही आल्या तथाकथित मराठी समाजाने लादून घेतलेली भाषा आहे)या तीनही भाषेत आला तर त्याचा निदान अर्थ समजण्या इतकी त्यांची कुवत आहे.

५) त्यांच्या मतदार संघातले प्रश्न त्यांच्या वडिलांमुळे (मा.श्री.स्वरराज ठाकरे)त्यांना पूर्ण अवगत आहेत.

६) आता निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभे राहिल्याच्या आधी कुठेही त्यांच्या बद्दल सर्व सामान्य जनतेत भीती धाक दपटशा अशी भावना नाही.

७) वेगात वाहन चालवून अपघात केल्याची एकही नोंद नाही.

८) एका कलाकार म्हणून मला सांगावेसे वाटते कि त्यांच्या पक्षाने कायम मला मानाचीच वागणूक दिली आहे.

९) त्यांच्या घराच्या आसपास असलेल्या सर्वसामान्य लोकांचे दैनंदिन प्रश्न ते त्यांच्या पक्षाच्या मदतीने सोडवत आले आहेत.

१०) शिवाजी पार्क ला जर तुम्ही दिवाळीच्या सुमारास गेला असाल तर त्यांच्या पक्षाने एक जागा निश्चित केली होती तिथे या वर्षी काही हजार तरुण तरुणी येऊन दिवाळी एकत्रपणे साजरी करत होते.आणि पार अकरा बारा वाजे पर्यंत निर्धास्त पणे वावरत होते.

आता श्री.अमित ठाकरे यांना मत का देऊ नये याबद्दल खूप विचार करून मुद्दा सुचेना पण तरीही शोधला

१) श्री.अमित ठाकरे अनुभवी नाहीत. पण तो आपणच त्यांना निवडून दिलं तर सहज मिळू शकेल.

माहीम मतदार संघाबद्दल सांगायचं झालं तर, या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. मतदारसंघात मनसेकडून अमित राज ठाकरे, महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे सदानंद सरवणकर आणि शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी मेट्रो वनच्या वेळेत वाढ, पहिली आणि शेवटची फेरी कधी सुटणार पाहा… निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी मेट्रो वनच्या वेळेत वाढ, पहिली आणि शेवटची फेरी कधी सुटणार पाहा…
मुंबईसह महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका येत्या 20 नोव्हेंबर रोजी आहेत. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी...
‘यावेळी मी स्वतःच नंदेकडे दिवाळीच्या फराळाचा डबा घेऊन गेले कारण..’, महागाईवरून सुप्रिया सुळेंचा सरकारला खोचक टोला
अक्षय कुमारचा 2025 मध्ये धुमाकूळच; 7 चित्रपट लागोपाट येणार; हॉरर, कॉमेडीसंग अॅक्शनचा तडका!
घरातील मोठी माणसं तुम्हाला अन्न चावून खाण्याच्या सल्ला देतात, जाणून घ्या त्याचे ५ जबरदस्त फायदे
मधुमेहाच्या रुग्णांनी न्याहारीमध्ये करावा ‘या’ ४ गोष्टींचा समावेश, शुगर लेव्हल राहील नियंत्रित
हिवाळ्यात ‘या’ 5 खाण्यापिण्याच्या सवयी टाळा, निरोगी आयुष्य जगा
शरीरात रक्ताची कमतरता असेल तर करा या पदार्थांचे सेवन, दहा दिवसात वाढेल रक्त