रोज एक लवंग खा आणि ‘या’ समस्या करा दूर

रोज एक लवंग खा आणि ‘या’ समस्या करा दूर

लवंग हा आयुर्वेदाचा खजिना आहे आणि आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध मानला जातो. हे पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. आपल्या किचनमध्ये अनेक मसाले असतात. या मसाल्यांचे अनेक फायदे असतात म्हणूनच आपल्या स्वयंपाकात त्यांना महत्त्वाचे स्थान असते. याने जेवणाची चवही वाढते. या मसाल्यातील महत्त्वाचा मसाला म्हणजे लवंग.

किचनमध्ये लवंग हा एक असा मसाला आहे जो आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. हे अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी वापरले जाते. लवंगाचे सेवन केल्यास शरीराला भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे, फायबर, प्रथिने, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅंगनीज कार्बोहायड्रेट आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात. रोज सकाळी उठून रिकाम्या पोटी लवंग चावून खाल्ल्यास आरोग्याचे अगणित फायदे होतील, जाणून घेऊया न्यूट्रिशनिस्ट निखिल वत्स यांच्याकडून रोज सकाळी रिकाम्या पोटी लवंग खाल्ल्याने तुमच्यासाठी कसा फायदेशीर ठरू शकतो.

रिकाम्या पोटी लवंग खाण्याचे फायदे

रोगप्रतिकारशक्ती वाढेल

आपण पाहिलंच असेल की कोरोना विषाणूची साथ आल्यापासून कोणत्याही प्रकारचा संसर्ग टाळता यावा यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर दिला जात आहे, बदलते हवामान, पावसाळा आणि हिवाळ्याच्या ऋतूत सर्दी, खोकला आणि फ्लूचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. रोज सकाळी उठल्याबरोबर लवंग चघळण्याची सवय लावली तर शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढेल. लवंगातील अँटिऑक्सिडंट गुणधर्म शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करतात, ज्यामुळे रोगांशी लढण्यास मदत होते.

लिव्हरचे संरक्षण

लिव्हर हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, कारण तो अनेक कार्ये करत असतो म्हणून आपण या अवयवाच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. लवंग खाल्ल्याने लिव्हरचे आरोग्य सुधारता येते.

तोंडाची दुर्गंधी निघून जाईल

लवंगाचा वापर नैसर्गिक माऊथ फ्रेशनर म्हणून करता येतो, कधी कधी तोंड साफ न केल्याने तोंडाला दुर्गंधी येते. लवंगामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, म्हणून रोज सकाळी लवंग चावून खाल्ल्यास तोंडातील जंतू मरतात आणि तोंडाची दुर्गंधी निघून जाते.

दातदुखी

जर अचानक तुमचा दात दुखत असेल आणि तुम्हाला कोणत्याही गोळ्या व पेनकिलर औषधे खायची इच्छा नसेल तर ताबडतोब दुखत असलेल्या दाताजवळ लवंगाचा तुकडा दाबा. ही समस्या जीवाणूंवर प्रभावीपणे मात करून दातदुखी बरी करते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी मेट्रो वनच्या वेळेत वाढ, पहिली आणि शेवटची फेरी कधी सुटणार पाहा… निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी मेट्रो वनच्या वेळेत वाढ, पहिली आणि शेवटची फेरी कधी सुटणार पाहा…
मुंबईसह महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका येत्या 20 नोव्हेंबर रोजी आहेत. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी...
‘यावेळी मी स्वतःच नंदेकडे दिवाळीच्या फराळाचा डबा घेऊन गेले कारण..’, महागाईवरून सुप्रिया सुळेंचा सरकारला खोचक टोला
अक्षय कुमारचा 2025 मध्ये धुमाकूळच; 7 चित्रपट लागोपाट येणार; हॉरर, कॉमेडीसंग अॅक्शनचा तडका!
घरातील मोठी माणसं तुम्हाला अन्न चावून खाण्याच्या सल्ला देतात, जाणून घ्या त्याचे ५ जबरदस्त फायदे
मधुमेहाच्या रुग्णांनी न्याहारीमध्ये करावा ‘या’ ४ गोष्टींचा समावेश, शुगर लेव्हल राहील नियंत्रित
हिवाळ्यात ‘या’ 5 खाण्यापिण्याच्या सवयी टाळा, निरोगी आयुष्य जगा
शरीरात रक्ताची कमतरता असेल तर करा या पदार्थांचे सेवन, दहा दिवसात वाढेल रक्त