ब्लड शुगर सतत वाढतेय, मग ‘हे’ घरगुती उपाय देतील चुटकीसरशी आराम
Home Remedies To Control Blood Sugar : अनियमित दिनचर्या, असंतुलित खाणे आणि व्यायामाचा अभाव यामुळे लोकांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. मधुमेह हा आजार लाखो लोकांच्या जीवनावर परिणाम करतो. त्यामुळे तुम्हाला तुमचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे फार महत्त्वाचे असते. जर ती सातत्याने वाढत असेल तर त्याचा तुमच्या शरीरातील किडनीवर आणि हृदयावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रक्तातील साखर नियंत्रित करण्याचे सोपे आणि घरगुती उपाय सांगणार आहोत.
दररोज व्यायाम करा : तुम्ही जर नियमित व्यायाम केला तर तुमची रक्तातील साखर नक्कीच नियंत्रणात राहील. व्यायाम केल्याने स्नायूंमध्ये ग्लुकोजचे प्रमाण वाढते आणि रक्तातील साखरेची पातळी कमी होते.
फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करा : फायबर हे रक्तातील साखरेची पातळी राखून ठेवण्यास मदत करते. आपल्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. हिरव्या भाज्या, फळे आणि शेंगदाणे यांचे भरपूर प्रमाणात सेवन करा यामुळे साखरेची पातळी कमी होते.
भरपूर पाणी प्या : पाण्याच्या कमतरतेमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. हे टाळण्यासाठी दिवसभरात किमान तीन ते चार लीटर पाणी प्यावे. कारण किडनी हे अतिरिक्त साखर बाहेर काढून टाकण्यास मदत करते.
पुरेशी झोप घ्या : आरोग्यासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. खरं तर झोपेच्या कमतरतेमुळे सुद्धा रक्तातील साखरेच्या पातळी वाढ होते. त्यामुळे दररोज सात ते आठ तासांची झोप घेणे आवश्यक आहे.
ताण घेऊ नका : ताणतणावाचा थेट परिणाम आपल्या रक्तातील साखरेवर होतो. ताणतणावातून सुटका मिळवायची असेल, तर रोज मेडिटेशन आणि योगा करावा. यामुळे तुम्ही तणावापासून मुक्त व्हाल. तुम्हाला आतून ताजेपणा जाणवेल.
वजन नियंत्रणात ठेवा : रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वजन नियंत्रित ठेवणे हा एक महत्त्वाचा भाग आहे. निरोगी आहार आणि नियमित व्यायामाने आपले वजन नियंत्रित करा. यामुळे तुम्हाला मधुमेहाचा त्रास होणार नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List