आकाशातील ग्रह नक्षत्रांचे मत कुणाला? विधानसभेच्या निवडणुकीत बळ कोणत्या नेत्याला, शनिदेव कुणाला धडा शिकवणार, ज्योतिषांनी काय मांडला भविष्याचा पसारा?

आकाशातील ग्रह नक्षत्रांचे मत कुणाला? विधानसभेच्या निवडणुकीत बळ कोणत्या नेत्याला, शनिदेव कुणाला धडा शिकवणार, ज्योतिषांनी काय मांडला भविष्याचा पसारा?

राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी मागे घेतल्यानंतर आता चित्र स्पष्ट झालं आहे. यावेळी अनेक चाणक्य आणि तज्ज्ञांना सुद्धा या निवडणुकीचे भाकित करताना अडचण येत आहे. कधी नव्हे ते चार पक्ष, दोन मोठ्या आघाड्या, अपक्ष, बंडखोर अशी हातघाईची लढाई आहे. लोकसभेचं उदाहरण ताजं असल्याने महायुतीने पूर्वीपासूनच खबरदारी घेतली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने त्याच चुकांची उजळणी केली आहे. सध्या राज्यातील राजकारण अवघड वळणावर आहे. त्याचा कल कोणत्या दिशेकडे झुकतो याचा अंदाज बांधणं अवघड आहे. राजकीय विश्लेषक, तज्ज्ञ यांना सूर गवसला नसला तरी काही ज्योतिषांनी आकाशातील ग्रहांची आणि नक्षत्रांची मांडणी करून काही ठोकताळे वर्तवले आहे. राज्यातील प्रमुख नेत्यांच्या ग्रहस्थितीवरून त्यांनी काही अंदाज मांडले आहेत. अर्थातच हा अंदाज आहे.

अजित पवार यांच्या पुत्रिकेत राहु-शनि मुक्कामाला

अजित पवार यांनी वर्षांपूर्वी बंडाचे निशाण हाती घेतले आणि राष्ट्रवादीसह ते महायुतीत डेरेदाखल झाले. अजितदादांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी दुपारी 1 वाजून 42 मिनिटांनी, अहमदनगर येथे झाला होता. तुला लग्नात त्यांच्या कुंडलीत मे 2023 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत बुधात विमशोत्तरी दशा सुरू आहे. बुध नवव्या (भाग्य) आणि बाराव्या (नुकसान) भावात आहे. त्याच काळात त्यांनी जुलै 2023 मध्ये भाजपाला जवळ केले. पण त्याचवेळी लोकसभेत त्यांना प्रभाव दाखवता आला नाही. अजित पवार राज्यात 53 विधानसभा मतदारसंघात नशीब आजमावत आहेत. अजितदादांच्या तुळ राशीत बुध राशीतील केतूचा कठीण काळ 2 नोव्हेंबर ते 27 डिसेंबरदरम्यान आहे. अजित पवार यांच्या मागे साडेसाती सुरू असल्याचे दिसून येते.

देवेंद्र फडणवीस यांच्या कुंडलीत कोणता प्रयोग?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणाला वेगळी दिशा दिली. त्यांच्या ऑपरेशन्स लोट्समुळे राज्यात दोन पक्षांची भर पडली. त्यांनी महायुतीसाठी बेरजेचे राजकारण केले. पण असे करताना त्यांना अनेक ठिकाणी तडजोड करावी लागली. त्यांचा जन्म 22 जुलै 1970 रोजी सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी नागपूर येथे झाला. कन्या लग्नाची पत्रिका आहे. लाभाच्या एकदश भावात बुधामुळे त्यांना 2014 ते 2019 या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता आले. तर डिसेंबर 2018 ते 2025 पर्यंत भाजपच्या फडणवीस यांच्या कन्या राशीत नुकसानदायक केतूची महादशा सुरू आहे. इतकेच नाही तर कुंभेच्या चंद्रावर शनीचे संक्रमण सुरू आहे. त्यांच्या पुत्रिकेत साडेसाती प्रकोप दिसत आहे.

उद्धव ठाकरे यांना ग्रहांचा कोणता खलिता?

उद्धव ठाकरे यांचा जन्म 27 जुलै 1960 रोजी सकाळी 10 वाजून 14 मिनिटांनी मुंबईत झाला. जन्म राशी कन्या असून चंद्र राशी सिंह आहे. जन्म लग्नात गुरू आणि बुध यांनी ठाण मांडल्याने त्यांना बळ मिळाले आहे. गुरूमध्ये केतूच्या दशेने त्यांना 2019 मध्ये अनेक संकटांचा सामना करावा लागला. मुख्यमंत्री असताना त्यांची ग्रहांनी परीक्षा घेतली. 2022 मध्ये त्यांच्या पत्रिकेतील शुक्राच्या षडाष्टक दशेमुळे पक्षात उभी फूट दिसून आली. पक्ष, चिन्ह हातचे गेले. सध्य स्थितीत गुरू ग्रहातील चंद्राची शुभ विमशोत्तरी दशा एप्रिल 2024 ते ऑगस्ट 2025 पर्यंत आहे. तर शनि हा गुरू राशीतून धनुमधून मार्गक्रमण करत तुळा राशिच्या नवमांशात आहे. त्यामुळे ग्रहांचे झुकते माप त्यांच्या पदरात दिसून येत आहे.

सुप्रिया सुळे यांना लॉटरी?

सुप्रिया सुळे यांचा जन्म 30 जून 1969 रोजी सकाळी 11 वाजता पुण्यात झाला. सध्या त्या लोकसभेच्या सदस्य आहेत. त्यांच्या पुत्रिकेत अनेक चांगल्या ग्रहांची बैठक पक्की होत आहे. बुध, मंगळ यांचे बळ त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या नवांश आणि दशमांश पुत्रिकेतील गुरू राशीत बुधाची विमशोत्तरी दशा अत्यंत शुभ स्थानी आहे. त्यांच्या पत्रिकेत राजयोगाची चिन्हं आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आकाशातील ग्रह नक्षत्रांचे मत कुणाला? विधानसभेच्या निवडणुकीत बळ कोणत्या नेत्याला, शनिदेव कुणाला धडा शिकवणार, ज्योतिषांनी काय मांडला भविष्याचा पसारा? आकाशातील ग्रह नक्षत्रांचे मत कुणाला? विधानसभेच्या निवडणुकीत बळ कोणत्या नेत्याला, शनिदेव कुणाला धडा शिकवणार, ज्योतिषांनी काय मांडला भविष्याचा पसारा?
राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी मागे घेतल्यानंतर आता चित्र स्पष्ट झालं आहे. यावेळी अनेक चाणक्य आणि तज्ज्ञांना सुद्धा...
Aishwarya Rai : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन घेणार ग्रे डिव्होर्स? कित्येक वर्ष सोबत राहिल्यानंतर उतार वयात कपल्स घटस्फोट का घेतात?
IPL 2025 – जेम्स अँडरसनची पहिल्यांदाच मेगा लिलावात एन्ट्री, 1.25 कोटी बेस प्राईज!
AMAZON पार्सलमध्ये काय निघालं? पाहताच महिलेला आली उलटी; जाणून तुम्हालाही बसेल धक्का
आईसोबत वाद झाल्याने घराबाहेर… सहा नराधमांनी केला सामूहिक बलात्कार
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले; शेअर बाजाराने दाखवली तेजी, टेक्नोलॉजीच्या स्टॉकची भरारी
अंधार, निराशा, वेदना आणि भिती! अभिनेत्री मनिषा कोयराला पहिल्यांदाच कॅन्सरवर मोकळेपणाने बोलली