कोण आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री, जिने अमेरिकेत केले मतदान, नसते केले तर हे रहस्य उलगडले नसते
बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत ज्यांना अमेरिका किंवा कॅनडा अशा देशाचे नागरिकत्व पत्करलेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर अनेकदा टीका केली जात असते. अनेक बॉलिवूड अभिनेते भारतातील निवडणूकीत मतदान करीत नाहीत त्यावरुन देखील त्यांना ट्रोलिंग केले जात असते. आता सोशल मिडीयावर अशाच एका अभिनेत्रीची चर्चा सुरु आहे. ही भारतीय वंशाची अभिनेत्री असून तिने अमेरिकन अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत मतदान केले आहे.ही बातमी उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. कारण तिच्या फॅन्सना ती अमेरिकन नागरिक आहे हे आता माहिती झाल्याने ते हैराण झालेले आहेत.
आपण जिची चर्चा करीत आहोत त्या अभिनेत्रीचं नाव आकांक्षा रंजन कपूर आहे. ती 31 वर्षांची आहे.तिने अलिकडेच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीत मतदान केले आहे.मंगळवारी अमेरिकेत 47 व्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीत तिने आपले मत दिले आहे. या निवडणूकीत रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक उमेदवार कमला हॅरिस यांच्या जोरदार टक्कर झाली आहे.आकांक्षाच्या मतदानाने तिच्या भारतीय चाहत्यांना लक्ष याकडे वेधले होते. त्यांना प्रथमच ती अमेरिकन नागरिक असल्याचे कळले आहे.
मुंबईत राहून अभिनयाचे करीयर करणारी आकांक्षा रंजन कपूर हीने आपल्या चाहत्यांना इंस्टाग्रामवरुन सांगतिले की तिने अमेरिकन निवडणूकीत मतदान केलेले आहे. तिने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केलेली आहे.त्यात तिने 'मी मतदान केले' असा बॅज घातलेली दिसत आहे.स्टोरीत कमला हॅरिस हीचे स्टीकर देखील असल्याने तिने कमला हॅरिस यांना मतदान केले हे स्पष्ट आहे.अनेक चाहत्यांना आकांक्षा अमेरिकन नागरिक आहे हे माहिती नव्हते.
आकांक्षा रंजन कपूर अमेरिकन नागरिक आहे ? असा सवाल करीत रेडिट पोस्टवर अनेकांच्या हैराण करणाऱ्या प्रतिक्रीया आलेल्या आहे. या प्रतिक्रीयात अशीही काही बॉलिवूड स्टारची नावे आहेत,ज्यांच्याकडे इतर देशांची नागरिकत्व आहे.यात दोन मोठी नावे नेहमीच चर्चेत असतात. एक अक्षय कुमार याचे नाव चर्चेत असते.त्याने अलिकडे कॅनडाचे नागरिकत्व सोडले आहे.दुसरे नाव आलिया भट्ट हिचे असते. आलियाकडे ब्रिटीश पासपोर्ट आहे. याशिवाय अनेक स्टारकडे परकीय नागरिकत्व आहे.
खास गोष्ट म्हणजे आलिया भट्ट आणि आकांक्षा दोघी मैत्रिणी आहेत. अभिनेता आणि दिग्दर्शक शशि रंजन आणि अनुरंजन यांची आकांक्षा मुलगी आहे. तिचा जन्म मुंबईत झाला असून शिक्षण देखील मुंबईच्या जमनाबाई नरसी स्कूलमधून झालेले आहे. आकांक्षा हीने साल 2020 मध्ये नेटफ्लिक्सचा चित्रपट 'गिल्टी' मधून अभिनयाची सुरुवात केली आहे.अलिकडेच तिने नेटफ्लिक्सची फिल्म 'मोनिका..ओ माय डार्लिंग' मध्ये देखील महत्वाची भूमिका केली होती. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List