‘त्या’ प्रत्येकाला 500 रुपये दिल्याचा आरोप, शिंदेंच्या उमेदवाराविरोधात ठाकरे गटाची निवडणूक आयोगात तक्रार

‘त्या’ प्रत्येकाला 500 रुपये दिल्याचा आरोप, शिंदेंच्या उमेदवाराविरोधात ठाकरे गटाची निवडणूक आयोगात तक्रार

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार अनिल देसाई यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. अनिल देसाई यांनी वरळीतील शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार केली आहे. वरळी येथील शोभायात्रेत 500 रुपये देऊन आम्ही या यात्रेत सहभागी झालो असल्याचं लोकांनी कबूल केलं आहे. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी तक्रार अनिल देसाई यांनी दिली आहे. आचारसंहितेचा भंग मिलिंद देवरा यांनी केला असून यांच्यावरती कडक कारवाई करावी, अशी मागणी अनिल देसाई यांनी केली आहे. अनिल देसाई यांच्या तक्रारीची गंभीर दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे. राज्य निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांना संबंधित व्हिडीओची 24 तासांच्या आत पडताळणी करुन कार्यवाही अहवाल सादर करावा, असा आदेश दिला आहे. अनिल देसाई यांच्या या आरोपांमुळे आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आता निवडणूक आयोगाकडून काय कारवाई केली जाते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अनिल देसाई यांनी तक्रारीत काय म्हटलं आहे?

महोदय, सोबत वरळी विधानसभेतील शिवसेना (शिंदे गट) उमेदवार मिलिंद देवरा यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करतानाच्या शोभायात्रेचा व्हिडिओ जोडत आहोत. सदर शोभायात्रेचे चित्रीकरण करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींनी ह्या शोभायात्रेत सहभागी लोकांना विचारले असता त्यांनी आपल्याला प्रत्येकी 500 रुपये देऊन शोभायात्रेत सहभागी होण्यास सांगितल्याचे कॅमेरासमोर कबूल केले आहे. ज्याचे असंख्य व्हिडिओज सर्व प्रसिद्धी तसेच समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत, असा दावा अनिल देसाई यांनी तक्रारीत केला आहे.

“निवडणूक आदर्श आचारसंहितेसंदर्भातील भारतीय राज्यघटनेच्या कलमानुसार पैशाचे आमिष दाखविणे हा गंभीर गुन्हा आहे. (Bribery as defined in clause (1) of section 123 of the Representation of the people Act, 1951 (43 of 1951). Under influence as defined in clause (2) of the said section)”, असं अनिल देसाई पत्रात म्हणाले आहेत.

“आपणांस विनंती आहे की, या गोष्टीची त्वरित गंभीर दखल घेऊन याबाबतीत संबंधित अधिकाऱ्यांस निवडणूक आदर्श आचारसंहिता भंगासंदर्भातील भारतीय राज्यघटनेच्या कलमानुसार सख्त कारवाईचे निर्देश यावेत आणि हा बेकायदेशीर खर्च वरळी विधानसभेचे शिवसेना (शिंदे गट) उमेदवार मिलिंद देवरा यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात यावा”, अशी विनंती अनिल देसाई यांनी केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्रातील सर्वात मोठा महासंग्राम, मतदानाचे अपडेट कुठे पाहाल? फक्त एक क्लिक आणि… महाराष्ट्रातील सर्वात मोठा महासंग्राम, मतदानाचे अपडेट कुठे पाहाल? फक्त एक क्लिक आणि…
राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी उद्या बुधवार 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदान सुरळीत पार पडावं म्हणून निवडणूक आयोग आणि...
ऐश्वर्यासोबत घटस्फोटाची चर्चा; अभिषेक जे बोलला ते ऐकूण अमिताभ भावुक, बिग बींच्या डोळ्यात अश्रू, Video
चांगली झोप हीच आरोग्याची गुरुकिल्ली, शांत झोपेसाठी या टीप्स आवश्य फॉलो करा
Assembly Election 2024 – रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदार संघात 38 उमेदवार रिंगणात, पोलीस यंत्रना सज्ज
मतदानासाठी बुधवारी शेअर बाजार, बँका बंद; सरकारी सुटी जाहीर
देख रहा है विनोद! व्हिडीओ शेअर करत काँग्रेसची भाजपवर जोरदार टीका
हे पाच कोटी कुणाच्या SAFE मधून निघाले आहेत? राहुल गांधी यांचा थेट नरेंद्र मोदी यांना सवाल