राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मांची नियुक्ती

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मांची नियुक्ती

Sanjay Varma New DGP Maharashtra : केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली केली होती. काँग्रेस नेते नाना पटोलेंसह विरोधकांकडून रश्मी शुक्ला यांची निवडणुकीपूर्वी बदली करावी, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने सकारात्मक प्रतिसाद देत रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन बदली करण्यात आली होती. यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदी कोणाची वर्णी लागणार याची सातत्याने चर्चा रंगली होती. अखेर राज्याच्या पोलीस महासंचालकपदी वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रश्मी शुक्लांच्या बदलीनंतर राज्याच्या मुख्य सचिवांनी नवीन महासंचालकांच्या नियुक्तीसाठी तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे निवडणूक आयोगाकडे पाठवण्याचे निर्देश दिले होते. यात मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस सेवेतले वरिष्ठ अधिकारी संजय वर्मा आणि रितेश कुमार या तीन नावांचा समावेश होता. अखेर आज वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय वर्मा यांची राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बातमी अपडेट होत आहे…

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘हे गँगवार असू शकतं; हा नोट जिहाद’, विनोद तावडे प्रकरणावर उद्धव ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया ‘हे गँगवार असू शकतं; हा नोट जिहाद’, विनोद तावडे प्रकरणावर उद्धव ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरारच्या राड्यावर प्रतिक्रिया दिली आहे. विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांना...
मोठी बातमी! विरार कॅश कांड प्रकरण; विनोद तावडेंवर गुन्हा दाखल
Deepika Padukone : दीपिकाचं बाळ, डिप्रेशनची खिल्ली उडवल्याने सोशल मीडियावर संताप, ‘तिला आता समजेल, की…’
स्मरणशक्ती वाढवायची? ‘या’ 4 टिप्स फॉलो करा
Work From Home चा काहींना फायदा, काहींचं टेन्शन वाढलं, वाचा रिपोर्ट
विनोद तावडेंसारखे भाजपचे मोठे नेते हॉटेलच्या किचनमध्ये का लपले? बविआच्या कार्यकर्त्यांचा आरोप
विनोद तावडेंना तात्काळ अटक करा – रमेश चेन्नीथला