स्पेनच्या राजा-राणीवर चिखलफेक
स्पेनमधील पूरग्रस्त व्हॅलेन्सिया भागात भेट देण्यासाठी गेलेल्या राजा फिलिप आणि त्यांची पत्नी राणी लेटेजिया यांच्यावर संतप्त लोकांनी चिखलफेक केली. लोकांनी किलर आणि शेम ऑन यू अशा घोषणाही दिल्या, असा दावा बीबीसी वृत्तवाहिनीच्या वृत्तात करण्यात आला आहे. यावेळी राजा फिलिपसोबत स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझही उपस्थित होते. पूर रोखण्यासाठी या नेत्यांनी पूर्वीपासूनच का काही केले नाही, असा सवाल यावेळी लोकांनी केला. दरम्यान, जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला. चिखलफेक हल्ल्यात तैनात असलेले दोन सुरक्षा रक्षक जखमी झाले. या घटनेनंतर स्पॅनिश राजा आणि पंतप्रधानांनी दौरा अपूर्ण सोडून राजधानी गाठली. स्पेनमध्ये इतिहासातील सर्वात मोठा महापूर आला असून आतापर्यंत 217 लोकांचा मृत्यू झाला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List