पंढरपूर विधानसभेसाठी प्रमुख चौरंगी लढत; एकूण 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

पंढरपूर विधानसभेसाठी प्रमुख चौरंगी लढत; एकूण 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

पंढरपूर विधानसभा मतदार संघासाठी 24 जण निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. पंढरपूरसाठी भाजपचे समाधान आवताडे, काँग्रेसचे भगीरथ भालके, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल सावंत तर मनसेचे दिलीप धोत्रे यांच्यात चौरंगी लढत होत आहे.

पंढरपूरमध्ये महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी थेट लढत होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आता पंढरपूर मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे. काँग्रेसकडून भगीरथ भालके तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अनिल सावंत उमेदवार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत मतांची विभागणी होण्याची शक्यता असून महायुतीचे भाजपचे उमेादवार समाधान आवताडे यांना फायदा होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

समाधान महादेव आवताडे भाजप, भगीरथ भारत भालके – काँग्रेस, अनिल सुभाष सावंत – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, दिलीप काशीनाथ धोत्रे – मनसे, दत्ता रामचंद्र वाडेकर – बसपा, अशोक रंगनाथ माने – वंचित बहुजन आघाडी, पंकज हरिश्चंद्र देवकते – रासप, राजेंद्र बापू बेदरे – महाराष्ट्र लोकहितवादी पार्टी, सुदर्शन रायचंद खंदारे – अखिल भारतीय सेना, अब्दुलरोफ मुलाणी – अपक्ष, आण्णा सुखदेव मस्के – अपक्ष, आशफान अब्दुल सय्यद – अपक्ष, अमोल सुरेश गायकवाड – अपक्ष, तुळजाराम भिमराव बंदपट्टे – अपक्ष, दर्शना श्रीगणेश माने देशमुख – अपक्ष, निशिकांत बंडु पाटील – अपक्ष, विराप्पा मधुकर मोटे – अपक्ष, युसुफ राजमहमंद मुजावर – अपक्ष, अ‍ॅड. बापू दादा मेटकरी – अपक्ष, संजय हणमंत वाघमारे – अपक्ष, विठ्ठल भिमराव भोरकडे – अपक्ष, श्रीकांत श्रीमंत नलावडे – अपक्ष, सिध्दराम सोमण्णा काकणकी – अपक्ष, ज्ञानेश्वर अरुण पचवाघ – अपक्ष, असे 24 जण पंढरपूर विधानसभेसाठी मैदान उतरले आहेत.

उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्यांमध्ये सुरज उत्तम काशीद, शैला अनिल सावंत, डॉ. संजयकुमार श्रीमंतराव भोसले, भालचंद्र यल्लापा कांबळे, वसंतराव दौलतराव देशमुख, आदित्य चंद्रकलेश्वर फत्तेपूरकर, देवानंंद रावसाहेब गुंड, रहूफ खाजाभाई बागवान, चंद्रकांत प्रभाकर बागल, युवराज दिनकर गायकवाड, संग्राम पांडूरंग ढाणे, महमद हुसेन अब्दूलहक उस्ताद, आप्पासाहेब मनोहर जाधव, दिनकर शिवाजी देशमुख या 14 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आदित्य ठाकरे यांचा प्रचाराचा धडाका! वरळी, माहीम, वांद्रे येथे रोड शोला तुफान प्रतिसाद आदित्य ठाकरे यांचा प्रचाराचा धडाका! वरळी, माहीम, वांद्रे येथे रोड शोला तुफान प्रतिसाद
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आज वरळी, माहीम मतदारसंघात रोड शो, तर...
मिंधेंच्या खात्यात 74 कोटींचा घोटाळा कसला; आदित्य ठाकरे यांचा खळबळजनक आरोप
महायुतीमुळे मराठी माणूस भिकेला लागला! चाकणमध्ये प्रचंड सभेत संजय राऊत यांचा घणाघात
वार्तापत्र – फातर्पेकर राखणार चेंबूरचा गड
मशालीने बेबंदशाही भस्म करून टाका! उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्रप्रेमींना कळकळीचे आवाहन
तलवारी म्यान झाल्या! आज रात्र मतदाराची, विनवण्या आणि आळवण्यांची
लेख – बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्यासाठी…!