Jammu-Kashmir : बांदिपोरा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, सर्च ऑपरेशन सुरू
जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी पुन्हा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. बांदिपोरा जिल्ह्यातील पनार परिसरात सुरक्षा दलाला संशयास्पद हालचाली दिसल्याने त्यांनी कारवाई सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.
गोळीबारानंतर दहशतवाद्यांनी जंगलात पळ काढला. सुरक्षा दलाकडून बांदिपोरा-पनारच्या जंगल परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. तसेच शुक्रवारी सायंकाळी झालेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर श्रीनगरच्या खानयार भागातदेखील सुरक्षा दलाकडून घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List