अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ, शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी निवडणूक आयोगाचे चौकशीचे आदेश
मिंधे गटाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सत्तार यांनी उमेदवारी अर्ज भरताना खोटी माहिती सादर केली होती. आता निवडणूक आयोगाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की महेश शंकरपल्ली यांनी निवडणूक आयोगाकडे अब्दुल सत्तार यांच्या विरोधात तक्रार केली होती. अब्दुल सत्तार यांनी उमेदवारी अर्ज भरताना आपल्या मालमत्तेबाबात खोटी माहिती दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी केला होता. शंकरपल्ली यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रारही दाखल केली होती.
आता निवडणूक आयोगाने या तक्रारीची दखल घेतली आहे. तसेच याबाबत 24 तासांत कार्यवाही करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List