भाजप नेते रावसाहेब दानवेंनी स्वतःची तुलना केली छत्रपती शिवाजी महारांजाशी, मी शिवाजी महाराज असल्याचे केले विधान
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते यांची स्वतःची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली आहे. मी शिवाजी महाराज असल्याचे रावसाहेब दानवे यांनी केले आहे.
जालन्यात टीव्ही ९ या मराठी वृत्तवाहिनीशी रावसाहेब दानवे बोलत होते. कन्नड, फुलंब्री आणि सिल्लोड या विधानसभा मतदारसंघात युतीचा धर्म पाळला गेला नाही असा आरोप मिंधे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना दानवे म्हणाले की औरंगजेबाला मी का उत्तर देऊ? मी छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि सत्तार औरंगजेब आहे असे दानवे म्हणाले.
दानवे यांच्या या विधानाने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. दानवे यांचा अनेकांनी निषेध केला असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात येत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List