शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी कमावले 124 लाख कोटी
शेअर बाजारात आज सायंकाळी 6 वाजता सुरू झालेल्या विशेष सत्राची सुरुवात सेन्सेक्सने 635 अंशांची झेप घेत 80 हजारांच्याही पुढे मजल मारत केली. मुंबई शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सुंदररामन राममूर्ती आणि बेन कॅपिटल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अमित चंद्रा यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते मुहूर्ताच्या ट्रेडिंगला सुरुवात झाली. गुंतवणूकदारांनी वर्षभराच्या कालावधीतील तेजीतून तब्बल 124.42 लाख कोटी रुपये कमावले. गेली दिवाळी ते यंदाच्या दिवाळीपर्यंत सेन्सेक्स आणि निफ्टी हे निर्देशांक अनुक्रमे 22.31 टक्के आणि 24.60 टक्के असे वाढले. गुरुवारी घसरणीसह बंद झालेल्या सेन्सेक्सने आज 14,484.38 अंशांची भर घातली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 4,780 अंशांनी उसळला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List