गगनबावडा तालुक्यातील कोदे बुद्रुक येथील रिसॉर्टवर छापा, 9 नृत्यांगनांसह 31 जणांना घेतले ताब्यात

गगनबावडा तालुक्यातील कोदे बुद्रुक येथील रिसॉर्टवर छापा, 9 नृत्यांगनांसह 31 जणांना घेतले ताब्यात

राज्यात सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आचारसंहितेमुळे निवडणूक निरिक्षकांसह पोलिसांची भरारी पथके ठिकठिकाणी तैनात असून,वाहनांसह पार्ट्यांवर करडी नजर आहे. अशातच बुधवारी रात्री उशिरा गगनबावडा तालुक्यातील कोदे बुद्रुक पैकी आंबेवाडी येथील नयनील फार्म रिसॉर्टमध्ये बेकायदेशीर सुरू असलेल्या पार्टीवर कोल्हापूर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी 9 नृत्यांगनांसह 31 जणांना ताब्यात घेतले. तर मद्य, मोबाईल फोन व इतर साहित्य असा तब्बल 4 लाख 51 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ऐन दिवाळीत तसेच आचारसंहिता सुरू असताना बेकायदेशीरपणे सुरू असलेला छमछम प्रकार समोर आल्याने, खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गगनबावडा तालुक्यातील कोदे बुद्रुक पैकी आंबेवाडी येथील बुधवारी (दि.30) रात्री नयनील फार्म रिसॉर्टमध्ये नृत्यांगनासोबत काही तरुण बेकायदेशीर पार्टी करत असल्याची माहिती मिळाली. उपविभागीय पोलिस अधिकारी शाहूवाडी विभाग व गगनबावडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने या पार्टीवर रात्री नऊच्या सुमारास छापा टाकला. यावेळी मद्यधुंद अवस्थेत तोकड्या कपड्यात, अश्लील व बीभत्स हावभाव करणाऱ्या नृत्यांगणांसह विगरपरवाना दारूचे सेवन करणारे तसेच मद्याच्या बाटल्या निदर्शनास आले. याप्रकरणी 9 नृत्यांगनांसह एकूण 31 जणांवर गगनबावडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये मुंबई, पुणे येथील काही जणांचा समावेश आहे. यावेळी पार्टीत आढळलेला मद्य, मोबाईल फोन व इतर साहित्य असा तब्बल 4 लाख 51 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री जाधव,उपविभागिय पोलिस अधिकारी आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गगनबावडा पोलिस ठाण्याचे स.पो.नि.ज्ञानदेव वाघ, श्रीकांत मामलेकर,मानसिग सातपुते,संदीप पाटील, सागर पाटील,दिगंबर पाटील,अशोक पाटील,अमोल तेली या पोलिस पथकाने ही कारवाई केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला काय?; शरद पवार काय म्हणाले? महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला काय?; शरद पवार काय म्हणाले?
महायुतीचा मुख्यमंत्री हा संख्याबळावर ठरणार नाही, असे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण होणार...
विषारी हवा आणि संसर्गापासून वाचवतील व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेली फळे
पुरुषांमधील वंध्यत्वावर ‘हा’ उपाय ठरेल रामबाण
ठाण्यात मिंध्यांनी आचारसंहिता खुंटीला टांगली, महिलांना साड्यांचे वाटप; शिवैसनिकाकडून भंडाफोड
Health Tips: 21 दिवस सतत रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे
पराभवाच्या भीतीने मोदींचे काँग्रेसवर खोटे आरोप: रमेश चेन्नीथला
कामे अर्धवट असतानाही विशिष्ट व्यक्तीसाठी उद्घाटन केलं जातं, बीकेसीत आग प्रकरणावरून सुप्रिया सुळेंची मोदींवर टीका