लग्न जुळलं, साखरपुड्याची बोलणी झाली; पण मुलाचं पॅकेज 30 ऐवजी 3 लाख असल्याचं समजताच तरुणी भडकली, घोर अपमानाचे स्क्रिनशॉट व्हायरल
हल्ली लग्न जमवणे खूप कठीण होत असल्याचे दिसते. त्यामुळे अनेक जण लग्न जुळवणाऱ्या संस्था, वेगवेगळ्या मेट्रोमोनिअल साईट्सवर अनुरुप असा जोडीदार शोधत असतात. या संस्था किंवा साईट्स तुमच्या अपेक्षेनुसार स्थळंही दाखवतात. मेट्रोमोनिअल साईट्सवर तर असंख्य स्थळे असतात. अर्था अनेकदा या साईट्सवरून लोकांची फसवणूकही होते. असाच एक प्रकार एका तरुणासोबत घडला. थेट साखरपुड्यापर्यंत आलेली बोलणी एका मेसेजमुळे फिस्कटली आणि मुलाचे पॅकेज 30 ऐवजी फक्त 3 लाख असल्याचे कळताच तरुणीने तरुणाचा घोर अपमान केला. याचे स्क्रिनशॉट तरुणाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले असून पैशासाठी हपापलेल्या स्थळांपासून लांब राहण्याचा सल्लाही दिला आहे.
एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, पहिले लग्न मोडल्यानंतर तरुण-तरुणीला दुसऱ्यांदा बोहल्यावर चढायचे होते. दोघेही आपल्या जोडीदारापासून विभक्त झालेले होते. दोघांची आधी ओळख झाली, मग माहितीची देवाण घेवाण झाली. त्यानंतर दोघे व्हॉट्सअपवर गप्पा मारू लागतात. तेव्हा तरुणीने लवकरात लवकर लग्नाचा बार उडवून देण्याची गळ घालते. तरुणाला मात्र अधिक वेळ हवा असतो. यावर तरुणी अधिक विलंब झाल्यास दुसरा जोडीदार शोधू असा इशाराच देते.
चॅटिंग सुरू असताना तरुण तरुणीला एक गोष्ट सांगायची असल्याचे म्हणतो. माफ कर, पण माझा पगार 30 लाख नसून 3 लाख रुपये आहे. मॅट्रोमोनिअल साईट्च्या प्रोफाईलमध्ये टायमिंग करताना चूक झाली, असे सांगतो. मुलाचे पॅकेज कमी असल्याचे कळताच तरुणीची सटकते अन् ती भावी नवऱ्याला शिव्यांची लाखोली वाहते. त्याचा घोर अपमानही करते. तरुणीची आईही त्याला धमक्या देते.
— Kish Siff (@KishwarSiff) October 26, 2024
तरुणाला कायदेशीर कारवाई करण्याचीही धमकी देण्यात येते. मात्र सदर तरुण मी वकील असल्याचे सांगतो तेव्हा तरुणी आणि तिच्या आईचे सूर बदलला. याचे स्क्रिनशॉट चॅट किश सिफ नावाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहेत.
? https://t.co/W7fdelZCo7 pic.twitter.com/bcKbJJkwD0
— Kish Siff (@KishwarSiff) October 26, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List