‘बाबा मला रोज तुमची आठवण येते’, झिशान सिद्दीकींची वडील बाबा सिद्दीकींबद्दल भावूक पोस्ट

‘बाबा मला रोज तुमची आठवण येते’, झिशान सिद्दीकींची वडील बाबा सिद्दीकींबद्दल भावूक पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांनी आज अतिशय भावनिक ट्विट केलं आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर 12 ऑक्टोबरला झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाच्या बाहेर गोळीबार करण्यात आल्या. रिक्षातून आलेल्या तीन हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण हादरलं आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणूक तोंडावर असताना अशी घटना घडल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे कोण आहे? याचा तपास पोलिसांकडून केला जातोय. पोलिसांनी या प्रकरणी अनेकांना अटक देखील केली आहे. या प्रकरणात बिश्नोई गँगचं नाव समोर आलं आहे. तसेच एसआरए प्रकल्पाशी संबंधित प्रकरणामुळे सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली का? या अँगलने सुद्धा पोलीस तपास करत आहेत. पण या दुर्घटनेमुळे सिद्दीकी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव झिशान यांनी आज ‘एक्स’वर ट्विट करत आपल्या वडिलांसोबतची आठवण शेअर केली आहे.

झिशान सिद्दीकी यांनी आपल्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाच वर्षांपूर्वीचा आहे. 24 ऑक्टोबर 2024 चा हा फोटो आहे. या दिवशी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता. त्यावेळी झिशान सिद्दीकी यांचा वांद्यातून विजय झाला होता. त्यावेळी बाबा सिद्दीकी यांना प्रचंड आनंद झाला होता. बाबा सिद्दीकी यांनी त्यावेळी झिशान यांना गळाभेट घेतली होती. त्या भेटीचा क्षण कुणीतरी कॅमेऱ्यात कैद केला होता. तोच फोटो शेअर झिशानने भावनिक पोस्ट केली आहे. “तुमच्या मेहनतीमुळे आणि माझ्यावरील विश्वासामुळे जे क्षण शक्य झाले ते या फोटोत कैद झाले होते, बाबा, मला रोज तुमची आठवण येते”, असं झिशान आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

झिशान यांची राजकीय पोस्ट

नुकतंच झिशानने एक राजकीय पोस्ट केली होती. यावेळी त्यांनी महायुतीकडून उमेदवारांची यादी शेअर करण्यात येत आहे. त्याबाबत त्यांनी सूचक ट्विट केलं. असं ऐकलं आहे की, वांद्रे पूर्व मतदारसंघात आमच्या जुन्या मित्रांनी उमेदवाराची घोषणा केली आहे. साथ निभवायची हे त्यांच्या नैतिकतेतच नव्हतं. नातं त्यांच्यासोबतच ठेवा जो आदर आणि सन्मान देईल. स्वार्थी लोकांची गर्दी वाढवण्यात काहीच उपयोग नाही. आता निर्णय जनता घेणार, असं ट्विट झिशान सिद्दीकी यांनी केलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भाजपच्या नाराजीनंतरही अजितदादा मलिकांच्या प्रचारात आघाडीवर, म्हणाले कोणीही कितीही विरोध करू द्या तरीही.. भाजपच्या नाराजीनंतरही अजितदादा मलिकांच्या प्रचारात आघाडीवर, म्हणाले कोणीही कितीही विरोध करू द्या तरीही..
निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रचाराला वेग आला आहे. यंदाची लढत महाविकास आघाडीविरोधात महायुती अशीच होणार आहे. दरम्यान भाजपकडून राष्ट्रवादीचे...
पुन्हा पैशांचं घबाड, विरार आणि नालासोपाऱ्यात कोट्यवधी रुपयांच्या रकमेसह 2 संशयास्पद व्हॅन सापडल्या, तपासाला वेग
‘खंजीर मागून नाही तर शेजारी बसून खुपसला गेला’, राज ठाकरेंच्या शिलेदाराचंच खळबळजनक ट्विट
उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का, मनसेच्या तरुण तडफदार नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश
भाजपच्या विरोधाला अजित पवारांची केराची टोपली, उघडउघड नवाब मलिक यांचा प्रचार, महायुतीत काय होणार?
वरळीत आदित्य ठाकरेंची मोठी खेळी; एकनाथ शिंदेंना धक्का, घडामोडींना वेग
महाविकास आघाडीचा तेलंगणा-कर्नाटक पॅटर्न; विधानसभेत विजयाचे बांधणार का तोरण?