“माझ्या चेहऱ्यावर दारू फेकली, मला मारलं”; हेमा शर्माने पतीचे आरोप फेटाळत केले गंभीर आरोप
‘बिग बॉस 18’ मधून बाहेर पडलेली पहिली स्पर्धक हेमा शर्माचे व्यक्तिगत आयुष्य जरा जास्तच वादग्रस्त ठरत आहे. हेमावर तिचे पती गौरव यांनी गंभीर आरोप केले होते. त्यामुळे हे वाद अजूनच चिघळताना दिसत होते. मात्र आता हेमाने देखील एका मुलाखती दरम्यान पतीने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच हेमाने उलट पतीवरच मारहाण, अत्याचार केल्याचे आरोप लावले आहेत.
अभिनेत्रीने सर्व आरोप फेटाळून लावले
हेमाला जेव्हा एका मुलाखती दरम्यान या सगळ्या आरोपांबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा तिने हे सगळे आरोप फेटाळून लावले. ती म्हणाली की,”त्या माणसाला हे पचवता येत नाही की, मी ज्या महिलेला सोडले ती ‘बिग बॉस’मध्ये पोहोचली आहे. त्याला फक्त प्रसिद्ध व्हायचे होते. त्याला सेलिब्रिटीचा नवरा म्हणून मिरवायचे होते. मी काम करावं अशी त्याची इच्छा होती. आणि माझ्या खर्चासाठी मला पैसे कमावणं भाग होतं याची मला जाणीव झाली”. असं म्हणत हेमाने पतीने वारंवार अत्याचार केल्याचे आरोप लावले.
पती मारहाण करायचा
हेमाने पती गौरववर मारहाण करण्याचे आरोपही लावले आहेत. हेमा म्हणाली “जेव्हा मी गरोदर होते, तेव्हा मी अलीगढमध्ये होते. त्यादरम्यान गौरवने मला खूप मारहाण केली होती. मी माझ्या डायरीत सर्व काही लिहिले आहे. जेव्हा माझ्या चेहऱ्यावर दारू फेकली गेली आणि मला जबर मारहाण केली”
हेमा पुढे म्हणाली “अलिगडमध्ये मला अतिशय वाईट वागणूक मिळाली. सर्वांसमोर मला आणि माझ्या मोठ्या मुलाला घराबाहेर काढण्याच्या धमक्या देण्यात आल्या. माझ्या मुलावरही खूप अत्याचार झाले. त्यावेळी मी डिप्रेशनमध्ये होते.मी स्वतःही डॉक्टरांकडे गेले होते. ही गोष्ट सप्टेंबर २०२२ ची आहे. गौरवने माझा खर्च उचलणेही बंद केले आहे. त्यानंतर मी माझे YouTube चॅनल सुरू केले” असं म्हणत हेमाने युट्यूब चॅनल सुरु करण्याचे कारण सांगितले.
हेमाचे पती गौरवचे आरोप काय होते?
एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत, हेमाचे पती गौरवने खुलासा करत म्हटलं की, हेमाने त्याला सांगितले होते जर त्याने तिला घर दिले तर ती त्याला मुलाचा ताबा लिखित स्वरुपात देईल. गौरव म्हणाला की, याचा अर्थ एक आई तिच्या मुलाचा अडीच कोटी रुपयांच्या बदल्यात त्याला मिळवून देण्याचा करार करत होती.
गौरव पुढे म्हणाला की, ‘बिग बॉस’मध्ये जाण्यासाठी हेमाने तिच्या अडीच वर्षांच्या मुलाचीही काळजी घेतली नाही’. त्यांनी हेमाला कलियुगी आई म्हटले. गौरवने पुढे खुलासा केला की. ‘त्याने हेमाचे यूट्यूब चॅनल युगांडामध्ये सुरु केले आहे. पण ती मुंबईला परतल्यावर सगळंच बदललं’.
अलीगढमध्ये वृद्धाश्रमाचे व्हिडीओ केवळ सहानुभूतीसाठी
गौरवने पुढे सांगितले की, नोकरी सोडून अलीगढमध्ये वृद्धाश्रम चालवण्याची त्याची योजना होती. पण हेमाने स्पष्टपणे याला नकार दिला होता. फक्त व्हिडीओ बनवण्यासाठीच येणार असल्याचं तिने सांगितले. तेव्हा लोकांच्या सहानुभूतीसाठी वृद्धाश्रमाचा व्हिडीओ बनवू देणार नसल्याचं गौरवने हेमाला स्पष्ट सांगितलं.
त्याच दिवसापासून दोघांमध्ये वाद सुरु झाला. जेव्हा गौरवला विचारण्यात आले की, हेमा मध्यरात्री घरुन निघून जाते आणि तिची कंपनी चांगली नाही असे तो का म्हणाला होता?. यावर गौरवने हेमाच्या मुलांवर नकारात्मक परिणाम होईल म्हणून त्याला याविषयी सविस्तर बोलणार नसल्याचे म्हटंले.
सध्या हेमा शर्मा आणि गौरव सक्सेना या पती-पत्निचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप लावणे सुरुच आहे. त्यामुळे अभिनेत्रीचे खाजगी आयुष्य जरा जास्तच चर्चेत असलेलं पाहायला मिळतं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List