जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमान खानने घेतला मोठा निर्णय, सततच्या…
बॉलिवूड अभिनेता सलमान खान हे गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. सलमान खानचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच सलमान खानचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातून शहनाज गिल आणि श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी यांनी बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. सलमान खानच्या चित्रपटांबद्दल चाहत्यांमध्ये कायमच एक मोठी क्रेझ बघायला मिळते. सलमान खानने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिली आहेत.
सलमान खान याला गेल्या काही दिवसांपासून सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. हेच नाही तर 14 एप्रिलला सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आल्याची हैराण करणारी घटना घडली. ज्यावेळी हा गोळीबार करण्यात आला, त्यावेळी सलमान खान हा घरात होता. काही दिवसांपूर्वीच सलमान खानचे जवळचे मित्र आणि एनसीपी नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई याच्या गॅंगकडून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली. सलमान खानच्या जवळचे असल्यानेच बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आल्याचे त्या पोस्टमध्ये म्हणण्यात आले. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आल्याचे बघायला मिळतंय.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतरही सलमान खानला जीवे मारण्याची धमकी लॉरेन्स बिश्नोई गॅंगकडून देण्यात आली. सलमान खान हा सध्या बिग बॉस 18 ला होस्ट करताना दिसतोय. जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमान हा पुढील शुटिंग करणार की नाही? हा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, त्यानंतर सलमान खानने बिग बॉसचा विकेंडचा वार होस्ट केला.
फक्त हेच नाही तर सलमान खान याने 22 ऑक्टोबरपासून सिकंदर चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केलीये. जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमान खान हा चित्रपटांचे शूटिंग पुढे ढकलू शकतो असा एक अंदाज होता. मात्र, सलमान खानने आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केलीये. म्हणजेच काय तर या धमकी प्रकरणात सलमान खानने आपल्या कामावर लक्ष केंद्रित केल्याचे बघायला मिळतंय.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List