बाबा सिद्दिकी हत्याकांड; संकेतस्थळावर शोधले कुर्ल्यात भाडेतत्त्वावर घर
माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणारे आरोपी कुर्ल्यात भाड्याने घर घेऊन तिथे राहत होते. घर खरेदी-विक्रीच्या संकेतस्थळावर शोध घेऊन त्यांनी एका दलालाशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी कुर्ल्यात भाडेतत्त्वावर खोली घेतली होती असे तपासात समोर येत आहे.
शिवकुमार गौतम, धर्मराज कश्यप आणि गुरनेल सिंह असे तिघे बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्याचा कट शिजल्यानंतर सप्टेंबरमध्ये मुंबईत आले होते. त्यांनी कुर्ल्यात राहण्याचे ठरवल्यानंतर घर खरेदी-विक्रीच्या संकेतस्थळावर भाडेतत्त्वावरील घराचा शोध घेतला. कुर्ला पश्चिमेकडील पटेल चाळीतली खोली क्रमांक 225 भाडेतत्त्वावर द्यायची असल्याचे कळताच आरोपींनी मध्यस्थामार्फत ती खोली घ्यायचे ठरवले. ती खोली भाड्याने घेतल्यानंतर तिघेही तिथे राहू लागले. मग तिथेच राहून त्यांनी बाबा सिद्दिकी यांना कुठे व कसे मारायचे यांची बारकाईने रेकी केली होती. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 20 जणांचे जबाब नोंदविले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List