तुरुंगातील कैद्याकडून करण जोहरला कोट्यवधींची ऑफर, ‘तू फक्त रक्कम सांग, मोलभाव करणार नाही…’
आरोपी सुकेश चंद्रशेखर याने बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर याला ओपन लेटर पाठवलं आहे. त्याने धर्मा प्रॉडक्शनसोबत हात मिळवणीसाठी इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी सुकेशने करण जोहरला मोठी ऑफर दिली आहे. सुकेश चंद्रशेखर याने करण जोहरला धर्मा प्रॉडक्शनमध्ये 50-70 टक्के भागिदारी खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. यासाठी सुकेश याने एक पत्र देखील लिहिलं आहे.
पत्राच्या माध्यमातून सुकेश याने धर्मा प्रॉडक्शनसोबत व्यवसाय करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. धर्मा प्रॉडक्शनला यशाच्या उच्च शिखरावर नेऊ इच्छीत असल्याचं त्याने पत्रात म्हटलं आहे. सुकेश याला फिल्म इंडस्ट्रीमध्ये गुंतवणूक करायची आहे. यासाठी त्याला धर्मा प्रॉडक्शन उत्तम संधी असल्याचं वाटतं आहे. एवढंच नाही तर, सुकेशने पत्रात करण जोहर याचं कौतुक देखील केलं आहे.
सुकेशने पत्रात सांगितलं, त्याची कंपनी एलएस होल्डिंग्ज अंतर्गत एक फिल्म प्रोडक्शन हाऊस आहे, ज्याचे नाव एलएस फिल्म कॉर्प आहे. या प्रोडक्शन हाऊसने 70 हून अधिक सिनेमांना आर्थिक मदत केली आहे. चित्रपटसृष्टीबद्दलची आवड व्यक्त करताना सुकेश म्हणाला, ‘सिनेमा माझ्यासाठी व्यवसाय नाही. माझ्यासाठी एक भावना आणि पॅशन आहे. कारण मी स्वतः सिनेमा प्रेमी आहे…’ असं देखील सुकेश म्हणाला आहे.
मोठी रक्कम देण्यासाठी सुकेश तयार…
सुकेश चंद्रशेखरने पत्रात लिहिलं आहे की, ‘धर्मा प्रॉडक्शन मधीली 50 ते 70 टक्के भागिदारी मला खरेदी करायची आहे. तू (करण) मला फक्त रक्कम सांगा. त्यामध्ये मी कोणत्याच प्रकारचा मोलभाव करणार नाही. पुढच्या 48 तासांत करार पूर्ण करु…’ असं देखील सुकेश पत्रात म्हणाला आहे.
करण जोहर याचं उत्तर…
सुकेश चंद्रशेखरच्या या ऑफरवर सिनेमा निर्माता करण जोहरकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. धर्मा प्रोडक्शन ही बॉलीवूडमधील सर्वात प्रतिष्ठित निर्मिती कंपन्यांपैकी एक आहे आणि या बॅनरखाली अनेक हिट सिनेमांची निर्मिती झाली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List