खलिस्तानी दहशतवादी पन्नूकडून ’एअर इंडिया‘चे विमान उडवण्याची धमकी
खलिस्तानी दहशतवादी गुरवतवंतसिंग पन्नू याने ‘एअर इंडिया’चे विमान बॉम्बने उडविण्याची धमकी दिली आहे. ‘आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी 1 ते 19 नोव्हेंबर यादरम्यान एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करू नये,’ असे पन्नूने धमकीत म्हटले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अनेक विमान कंपन्यांना विमान बॉम्बने उडविण्याच्या 100हून अधिक धमक्या आल्या आहेत. यामुळे विमान आणि हवाई वाहतूक विभाग ‘अलर्ट’ झाला आहे. त्यातच आता पन्नूने धमकी दिली आहे.
पन्नूने एक व्हिडीओ जारी केला आहे. ‘1984 साली शीखविरोधी दंगली भडकविल्या होत्या. त्या घटनेला 40 वर्षे होत आहेत. त्यानिमित्त एअर इंडियाच्या विमानावर हल्ला होऊ शकतो. विमान बॉम्बने उडवू. त्यामुळे 1 ते 19 नोव्हेंबरदरम्यान प्रवास करू नये,’ अशी धमकी पन्नूने दिली आहे. गेल्या वर्षीही पन्नूने अशीच धमकी दिली होती.
धमकी देणाऱ्यांना विमान प्रवास बंदी
विमानांमध्ये बॉम्ब ठेवण्याच्या धमक्या देणाऱ्यांना जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद, विमान प्रवास करण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करत दंडही आकारण्यात येणार आहे. धमक्यांबाबत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक आरएस भाटी आणि ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीचे महासंचालक झुल्फिकार हसन यांनी केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांची भेट घेतली. या बैठकीत गृह मंत्रालयाला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांमधील धमक्यांबद्दल माहिती देण्यात आली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List