मुद्दा – आरोग्य सेवांची सक्षमता!

मुद्दा – आरोग्य सेवांची सक्षमता!

>> वैभव मोहन पाटील

आपल्या व कुटुंबाच्या निरोगी आयुष्यासाठी प्रत्येकाने दक्ष असणे आवश्यक आहे. यासाठी व्यक्तिगत स्वच्छता फार महत्त्वाची आहे. शासनाच्या माध्यमातून आज अनेक आरोग्य सेवा व योजना गरीब, गरजू लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सदर योजनांची व्यापक प्रसिद्धी व प्रचार होणे गरजेचे आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत या आरोग्य सेवा पोहोचतील. लोकांच्या बदललेल्या जिवनशैलीमुळे तसेच वातावरणातील बदलांमुळे निरनिराळे आजार जन्म घेत असून त्यांवरील उपचार पद्धती व खर्चाची व्याप्तीदेखील वाढत आहे.

आज समाजात पसरत चाललेल्या निरनिराळय़ा संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने आरोग्याच्या दृष्टीने योग्य काळजी घेण्याची गरज आहे. या आजारांचा सामना करावा लागू नये यासाठी सर्वात मोठी काळजी घ्यावी लागेल ती स्वच्छतेची. वैयक्तिक व सामाजिक स्वच्छता ही माणसाच्या आरोग्यावर विपरीत व दुरगामी परिणाम करते. सार्वजनिक स्वच्छतेची सुरुवात वैयक्तिक स्वच्छतेपासून होते. प्रत्येकाने आपले घर व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शिक्षण ही विकासाची पहिली पायरी आहे व स्वच्छता हा आरोग्याचा अविभाज्य भाग आहे. आपल्या घरांची, गावांची, परिसराची व पर्यायाने देशाचीही स्वच्छता वैयक्तिक योगदानातून कशी होईल याचा विचार प्रत्येकाने करणे व त्यायोगे ‘स्वच्छतेतून समृद्धीकडे’ ही संकल्पना मूर्तरुपात येणे अपेक्षित आहे. अस्वच्छ परिसर व वैयक्तिक स्वच्छतेअभावी उद्भवणाऱया रोगांमुळे पीडित असलेल्यांची आकडेवारी वाढत आहे. त्यामुळे स्वच्छतेतून लोकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी शासनही प्रयत्नशील असून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, निर्मल भारत अभियान, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना यांसारख्या योजनांमध्ये ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग घेऊन स्वच्छतेचे महत्त्व पटविण्यात येत आहे. परदेशात जाऊन आल्यानंतर आपण तेथील शहरांची स्वच्छता पाहून त्यांचे गुणगान गातो, मात्र तेथील स्वछता, शिस्त, सौंदर्य, सृष्टी व हिरवळ वाखाणण्याजोगी आहे ती केवळ तेथे राहणाऱया लोकांमुळेच हेदेखील विसरता कामा नये. आपण आपले घर स्वच्छ ठेवतो, पण परिसराशी आपल्याला काही देणेघेणे नसते. अस्वच्छतेमुळे होणाऱया आजारांमुळे आपले आरोग्य धोक्यात येऊन आपला घामाचा पैसा व वेळ वाया जात आहे. आज सार्वजनिक ठिकाणी बस, ट्रेन, इमारती, कार्यालये, उद्यान, रस्ते या ठिकाणी आपल्याला अस्वच्छतेचे साम्राज्य दिसते. कुठेही थुंकणे, पान खाऊन पिचकारणे, सिगारेटची थोटके, खाद्यपदार्थांची वेष्टने, कागदाचे तुकडे, तंबाखू, गुटख्याच्या पिचकाऱयांनी रंगविलेल्या भिंती दिसतील. आपल्याकडील नद्या व नाले या सांडपाणी वाहून नेणाऱया गटारी बनल्या आहेत. कचऱयाचे डोंगर शहरांमध्ये तयार होत आहेत. अनेक रोग हे अस्वच्छतेमुळे होत आहेत. आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकानेच अंगी बाळगावयास हवी. आपण केवळ वैयक्तिक स्वच्छतेवरच भर न देता सामुदायिक पातळीवर एकत्र येऊन काम केल्यास आपले शारीरिक स्वास्थ्य व सामाजिक स्वास्थ्य टिकण्यास व वृद्धिंगत होण्यास मदत होईल. स्वच्छतेमुळे आपण केवळ वैयक्तिक स्वार्थ साधत नाहीतर, ती एक मोठी देश सेवा व निसर्ग सेवाही आहे.

आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ राखण्यासाठी वैयक्तिक पातळीवर खूप गोष्टी करता येतात. आजकाल जागोजागी पसरलेल्या कचऱयामध्ये सर्वात मोठय़ा प्रमाणावर दिसणारा घटक म्हणजे प्लॅस्टिक. एकतर प्लॅस्टिकचे विघटन होत नाही व हा प्लॅस्टिकचा कचरा आरोग्यासाठी खूप घातक आहे. त्यामुळे आपण सर्वांनी प्लॅस्टिक पिशव्या व प्लॅस्टिकचे आवरण असलेले खाद्यपदार्थ वापरणे बंद करायला हवे तसेच प्लॅस्टिकचे विघटनदेखील योग्य मार्गाने करायला हवे. सार्वजनिक ठिकाणी कचरा न फेकणे, न थुंकणे या बाबीदेखील कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. घरातील व सोसायटीतील कचऱयाची योग्य त्या ठिकाणी ओला-सुका वर्गीकरण करून विल्हेवाट लावली गेली पाहिजे. जमेल तशी व जमेल तेव्हा परिसराची स्वच्छता केली पाहिजे व इतरांनादेखील त्यासाठी प्रवृत्त करायला हवे. पेंद्र शासनाने आणलेली स्वच्छ भारत संकल्पना देशाला अधिक समृद्ध व सुंदर बनवणारी असून यासाठी आपला सर्वांचाच सहभाग अत्यंत मोलाचा आहे.

लोकांचे आरोग्य सुदृढ राखायचे असेल तर आरोग्य संस्था सक्षम व स्वच्छ व्हायला हव्यात या उद्देशाने आरोग्य सेवांच्या सक्षमतेकडे जास्तीत जास्त लक्ष पेंद्रित करण्यात येत आहे. यासाठी रुग्णांना उपचारा दरम्यान चांगल्या वातावरणाचा अनुभव द्यायचा असेल तर रुग्णालयीन स्वच्छता राखणे ही फार महत्त्वाची आहे. स्वच्छतेचा हा पायंडा भविष्यातदेखील सरकारी आरोग्य संस्थांमध्ये कायमस्वरूपी टिपून राहायला हवा जेणेकरून सर्वसामान्य लोकांचा सरकारी दवाखान्यांकडे पाहण्याचा चांगला दृष्टिकोन तयार होईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

परतीच्या पावसाचा जोर आणखी वाढणार, विजांच्या कडकडाटासह मुसळधार बरसणार; हवामान विभागाकडून अलर्ट जारी परतीच्या पावसाचा जोर आणखी वाढणार, विजांच्या कडकडाटासह मुसळधार बरसणार; हवामान विभागाकडून अलर्ट जारी
मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी सोमवारी रात्रीपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाडा सहन करत असलेल्या नागरिकांना...
भाजपच्या मोठ्या माशांना वाचवण्यासाठीच अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, संजय राऊत यांचा सरकारवर निशाणा
सामना अग्रलेख – एका शिंद्याचे एन्काऊंटर!
उत्तर प्रदेशात पुन्हा हॉटेलांवर मालकाचे नाव लिहिण्याची सक्ती, योगी सरकारची खुमखुमी जिरेना
मुद्दा – आरोग्य सेवांची सक्षमता!
मेडिकल कॉलेजांतील एनआरआय कोटा म्हणजे पैसे कमावण्याची मशीन, ही फसवणूक बंद झाली पाहिजे; सर्वोच्च न्यायालयाने खडसावले
लेख – रोजगाराचे मुक्त अंगण