मेडिकल कॉलेजांतील एनआरआय कोटा म्हणजे पैसे कमावण्याची मशीन, ही फसवणूक बंद झाली पाहिजे; सर्वोच्च न्यायालयाने खडसावले

मेडिकल कॉलेजांतील एनआरआय कोटा म्हणजे पैसे कमावण्याची मशीन, ही फसवणूक बंद झाली पाहिजे; सर्वोच्च न्यायालयाने खडसावले

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एनआरआय अर्थात अनिवासी भारतीय कोटा म्हणजे पैसे कमावण्याची मशीन आणि मोठा घोटाळा असून ही फसवणूक तत्काळ बंद झाली पाहिजे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने आज पंजाब सरकारला खडसावले. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एनआरआय कोटा वाढवण्याची पंजाब सरकारची विनंती याचिका पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने फेटाळली होती. या निर्णयाला पंजाब सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

सरन्यायाधीश डी. वाय.चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने पंजाब सरकारची याचिका फेटाळताना तिखट शब्दांत कानउघाडणी केली. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एनआरआय कोटय़ात वाढ करून विद्यार्थ्यांच्या लांबच्या नातेवाईकांचाही समावेश करण्यात येणार आहे. एनआरआय कोटय़ांतर्गत 15 टक्के आरक्षण देण्यात येते. मात्र एनआरआय कोटा हा एक घोटाळा आहे, असे सरन्यायाधीश म्हणाले. तसेच हा घोटाळा तत्काळ बंद झाला पाहिजे, असेही सुनावले.

काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?

एनआरआय कोटा हा एक मोठा घोटाळा असून तो आम्ही थांबवणारच. ही फसवणूक थांबायलाच हवी. याप्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय चुकीचा नाही, त्यांच्या निर्णयात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असे सर्वोच्च न्यायालय म्हणाले. एनआरआय कोटा केवळ धोकेबाजी आहे, बाकी काहीच नाही. असे असतानाही पंजाब सरकारने 19-20 ऑगस्टला एनआरआय कोटय़ाचा विस्तार करण्याबद्दलची नवी अधिसूचना जारी केली. त्याचा परिणाम अतिशय घातक होऊ शकतो. ज्या उमेदवारांचे गुण तीन पट अधिक असतील त्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही, पण एनआरआय कोटय़ांतर्गत विद्यार्थी मागील दाराने प्रवेश घेतील हे भंयकर आहे, अशी टिपण्णीही सर्वोच्च न्यायालयाने केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

परतीच्या पावसाचा जोर आणखी वाढणार, विजांच्या कडकडाटासह मुसळधार बरसणार; हवामान विभागाकडून अलर्ट जारी परतीच्या पावसाचा जोर आणखी वाढणार, विजांच्या कडकडाटासह मुसळधार बरसणार; हवामान विभागाकडून अलर्ट जारी
मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी सोमवारी रात्रीपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाडा सहन करत असलेल्या नागरिकांना...
भाजपच्या मोठ्या माशांना वाचवण्यासाठीच अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, संजय राऊत यांचा सरकारवर निशाणा
सामना अग्रलेख – एका शिंद्याचे एन्काऊंटर!
उत्तर प्रदेशात पुन्हा हॉटेलांवर मालकाचे नाव लिहिण्याची सक्ती, योगी सरकारची खुमखुमी जिरेना
मुद्दा – आरोग्य सेवांची सक्षमता!
मेडिकल कॉलेजांतील एनआरआय कोटा म्हणजे पैसे कमावण्याची मशीन, ही फसवणूक बंद झाली पाहिजे; सर्वोच्च न्यायालयाने खडसावले
लेख – रोजगाराचे मुक्त अंगण