विठुरायाच्या टोकन दर्शनाचा मार्ग मोकळा; तिरुपतीच्या धर्तीवर दर्शन रांगेची अद्यावत व्यवस्था

विठुरायाच्या टोकन दर्शनाचा मार्ग मोकळा; तिरुपतीच्या धर्तीवर दर्शन रांगेची अद्यावत व्यवस्था

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मंडप, दर्शन रांग व स्काय वॉक या कामासाठी 129 कोटी 49 लाख रुपयांच्या आराखड्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या आराखड्यास निधी मंजूर झाल्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या टोकन दर्शनाचा मार्गही आता मोकळा होणार आहे. टोकन दर्शन पध्दतीमुळे श्री विठ्ठल रुक्मिणीचे भाविकांना जलद व सुलभ दर्शन मिळण्यास मदत होणार आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यासाठी विशेष पाठपुरावा केला होता.

राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे 305 कोटी 63 लाख रुपयांच्या आराखड्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. यात पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात भाविक आणि पर्यटकांसाठी दर्शन मंडप व दर्शन रांग, स्काय वॉक या सुविधा उभारण्यात येणार आहे. या कामासाठी 129 कोटी 49 लाख रुपयांच्या आराखड्यास मान्यता दिली आहे.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. समाधान अवताडे, आ. सरोज अहिरे, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, सोलापुरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आदी उपस्थित होते.

पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी येत असतात. पंढरपूर येथे आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्र या चार वार्‍या भरतात. सध्याची दर्शन रांग व्यवस्था अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे दर्शन मंडप व स्काय वॉक या माध्यमातून भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था व्हावी, यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाने 129.49 कोटीचा आराखडा तयार केलेला होता. हा आराखडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य शिखर समिती समोर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सादर केला. या आराखड्यास समितीने मंजुरी दिलेली असून पुढील आठ दिवसात याबाबतचा शासन निर्णय निघणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

भाविकांसाठी प्रशस्त दर्शन मंडप

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यभरातून नेहमीच भाविक येत असतात. आषाढी आणि कार्तिक वारीसाठी लाखो वारकरी आणि भाविक पर्यटक पंढरपूरात येतात. त्यांच्यासाठी अद्ययावत असा दर्शन मंडप उभारण्यात येणार आहे. सुमारे 16 हजार चौरस मीटरच्या या मंडपात पहिल्या व दुसर्‍या मजल्यावर 6 हजार भाविकांची सोय करण्यात येईल. या सर्वांना वेळेनिहाय टोकन पद्धतीने प्रवेश देण्यात येईल. त्याचबरोबर त्यांना स्कायवॉक पद्धतीच्या एक किलोमीटरची दर्शन रांगही असेल. या मंडप आणि दर्शन रांगेमुळे भाविकांना सुरक्षित, सुसह्य आणि सोयी-सुविधांनी युक्त अशी दर्शनाची सोय उपलब्ध होणार आहे. स्कायवॉक असल्याने स्थानिकांना दर्शन रांगेचा त्रास होणार नाही. तसेच भाविकांचा दर्शनासाठी लागणार वेळ कमी होणार आहे.

अशा आहेत सुविधा

श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना दर्शन मंडप आणि रांगेत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, लिफ्ट, वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणार आहेत. अन्नछत्राच्या माध्यमातून जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे. याठिकाणी भाविकाना कमीत कमी वेळेत दर्शन व्हावे. यासाठी टोकन पद्धतीने प्रवेश दिला जाणार आहे. निश्चित केलेल्या वेळेतच त्यांना मंडप व रांगेत प्रवेश दिल्याने गर्दीचेही नियंत्रण होणार आहे. याशिवाय यात दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक, मातांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे.

प्रस्तावित आराखड्यातील काम पूर्ण झाल्यानंतर दर्शनार्थी भाविकांना जलद व सुलभ दर्शन होण्यास मदत होणार आहे. या कामास शासनाने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मंदिर समितीच्या वतीने समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर शासनाचे आभार मानले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विश्वसुंदरी ऐश्वर्या रायला मागे टाकत महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट आयएमडीबीच्या यादीत आघाडीवर विश्वसुंदरी ऐश्वर्या रायला मागे टाकत महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट आयएमडीबीच्या यादीत आघाडीवर
या आठवड्यात प्रिया बापटने आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. अलीकडेच तिची सिरिज ‘रात जवान है’ चा...
ना हिंदू ना मुस्लिम, सबा आझाद हिच्याकडून धर्माबद्दल अत्यंत मोठा खुलासा, म्हणाली, माझे…
विठुरायाच्या टोकन दर्शनाचा मार्ग मोकळा; तिरुपतीच्या धर्तीवर दर्शन रांगेची अद्यावत व्यवस्था
बदलापूर प्रकरणातील आरोपीचे कोणीही समर्थन केले नाही, स्वतःचे पाप दुसऱ्यावर ढकलण्याचा सरकारचा प्रयत्न : नाना पटोले
योजनेच्या नावाखाली ग्रामस्थांचे फोटो घेतले, भाजपने आंदोलनाच्या बॅनरवर चिकटवले
Photo – गुलाबी रंगाच्या काश्मीरी सूटमध्ये हिना खानचा ग्लॅमरस अंदाज
Mollywood Me Too – अभिनेत्रीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप, अभिनेते सिद्धीकींविरोधात अरेस्ट वॉरंट जारी