राज्यातील तीर्थक्षेत्र विकासासाठी 305 कोटी

राज्यातील तीर्थक्षेत्र विकासासाठी 305 कोटी

राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे 305 कोटी 63 लाख रुपयांच्या आराखडय़ांना आज सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.  यामध्ये श्री क्षेत्र पंढरपूर येथील दर्शन मंडप आणि दर्शन रांग या सुविधेसाठी 129 कोटी 49 लाख रुपयांच्या कामांचाही समावेश आहे. तर नाशिक जिह्यातील  भगूर  येथील स्वातंत्र्यवीर  सावरकर यांच्या जीवनावर आधारित थीम पार्प साकारण्यात येणार असून  त्यासाठीच्या 40 कोटी रुपयांच्या प्रस्तावास तसेच पहिल्या टप्प्यातील 15 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली. मुंबईवरील ‘26/11’ च्या दहशतवादी हल्ल्यात अजमल कसाब या सशस्त्र दहशतवाद्यास जिवंत पकडणाऱ्या शहीद तुकाराम ओंबळे यांच्या सातारा जिह्यातील केंडबे (ता. जावळी) येथील मूळगावी  स्मारक उभारण्यासाठी 15 कोटी रुपयांच्या निधीच्या तरतुदीस बैठकीत मान्यता देण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खड्डे बुजवण्यासाठी एमआयडीसीकडून एसटी महामंडळावर 500 कोटींची खैरात, काँक्रीटीकरणाच्या निविदा परस्पर काढल्या खड्डे बुजवण्यासाठी एमआयडीसीकडून एसटी महामंडळावर 500 कोटींची खैरात, काँक्रीटीकरणाच्या निविदा परस्पर काढल्या
राज्यातील एसटी डेपोतील खड्डे बुजवण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) एसटी महामंडळाला 500 कोटी रुपये दिले आहे. पण हा निधी...
मुंबई बँकेची मोबाईल नेट बँकिंग सेवा लवकरच
फुलंब्रीत तहसीलदारांची खुर्ची जाळली; मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळली… संतप्त मराठा आंदोलक आक्रमक
नाहूर ते मुलुंडपर्यंत रेल्वेला समांतर जोडमार्ग उभारा, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शिवसेनेची मागणी
राज्यातील तीर्थक्षेत्र विकासासाठी 305 कोटी
अखेर घटस्फोटाबद्दल नेहा कक्कर हिच्या पतीकडून ‘तो’ मोठा खुलासा, रोहनप्रीत सिंहने थेट म्हटले…
Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : पोलिसांच्या व्हॅनमध्येच अक्षय शिंदेचं एन्काऊंटर, पाहा Video