परतीच्या पावसाला आणखी जोर चढणार; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

परतीच्या पावसाला आणखी जोर चढणार; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

यंदा समाधानकारक मॉन्सून झाला आहे. तसेच आता मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे. या परतीच्या पावसाचा जोर आता आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागात येत्या 24 तासात कमी दाबाचा पट्टा तयार होणार असल्याने परतीच्या पावसाचा जोर वाढणार आहे. मॉन्सूनने आता राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू केला असून त्याचा परतीचा प्रवास कच्छपर्यंत आला आहे. बंगालच्या उपसागारातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात येत्या 3 ते 4 दिवसात पावसाचा जोर वाढणार आहे.

राज्यात पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा 24 तासांत तयार होत असल्याने राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र या भागातपुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता व्रतवण्यात आली आहे. मुंबई आणि कोकणातही पाऊस हजेरी लावणार आहे. पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईच्या भुयारी मेट्रो तीनचं तिकीट किती असणार ? मोठा पाऊस आला तरी मेट्रो सरुच राहणार का ? मुंबईच्या भुयारी मेट्रो तीनचं तिकीट किती असणार ? मोठा पाऊस आला तरी मेट्रो सरुच राहणार का ?
मुंबईच्या पहिल्या वहिल्या भूयारी मेट्रोच्या पहिल्या बीकेसी ते आरे JVLR या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होऊ घातलं आहे....
नवी मुंबई विमानतळावर विमान लँडिंग टेस्टचा मुहूर्त ठरला, 350 विमाने एकाच वेळी पार्क होणार
एसटी महामंडळाची भन्नाट योजना, ज्या दिवशी उत्पन्न वाढणार,त्याच दिवशी प्रोत्साहन भत्ता हाती पडणार !
Akshay Shinde Encounter : ड्रायव्हरजवळ बसलेले PI मागे का गेले? अक्षय शिंदेचा एन्काऊंटर का केला? पोलीस अधिकाऱ्याने सर्व सांगितलं
तिरुपती लाडूच्या वादावरून दोन दिग्गज अभिनेते भिडले, पवन कल्याण यांनी प्रकाश राज यांना सुनावले
Badlapur Protest : आंदोलकांवरील गुन्हे केव्हा मागे घेणार? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल
नवीन मोबाईलची पार्टी दिली नाही म्हणून 16 वर्षांच्या मुलाचा जीव घेतला, मित्रांनीच केला घात