सरकारी कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्त्याला मुकावे लागणार, सरकारकडे निधीच नाही; विजय वडेट्टीवार यांचा आरोप

सरकारी कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्त्याला मुकावे लागणार, सरकारकडे निधीच नाही; विजय वडेट्टीवार यांचा आरोप

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे अन्य शासकीय योजनांचा खोळंबा झाला आहे. बहुतांश निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवला जात असल्याने सरकारकडे कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी पैसे नाहीत. परिणामी अनेक कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता कापून पगार दिला जाण्याची शक्यता विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आज व्यक्त केली.

शेतकरी त्रस्त, मंत्री नाचण्यात व्यस्त

विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठवाडय़ात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असताना महायुती सरकारला, राज्याच्या कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांना लक्ष द्यायला वेळ नाही. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची चूल पेटली नाही. मात्र  राज्याचे कृषी मंत्री सिनेतारकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी मदत मागायची कुणाकडे हा खरा प्रश्न आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

सरकार अडकले श्रेयवादात

राज्य सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेच्या श्रेयवादात अडकले आहे. या सरकारमधील मंत्री स्वतःच्या मुलीला, जावयाला नदीत ढकला असे  म्हणत असेल तर या सरकारकडून जनतेने कोणती अपेक्षा करायची? फसव्या योजनांना महाराष्ट्रातील जनता पंटाळली आहे, असे ते म्हणाले.

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 80 ते 85 जागांवर विजय  मिळेल. तर 152च्या आसपास जागा जिंकत महाविकास आघाडी सत्तेत येईल, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Akshay Shinde Encounter : दोन्ही हातात बेड्या असताना… अक्षय शिंदे एन्काऊंटरवरून सुषमा अंधारे यांनी वेधलं त्या मुद्द्याकडे लक्ष; पोलिसांनाच विचारला जाब Akshay Shinde Encounter : दोन्ही हातात बेड्या असताना… अक्षय शिंदे एन्काऊंटरवरून सुषमा अंधारे यांनी वेधलं त्या मुद्द्याकडे लक्ष; पोलिसांनाच विचारला जाब
बदलापूर मधील शाळेतील चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाल्यानंतर विरोधकांकडून याप्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित...
‘तुम्हाला पटेल किंवा..’ अरबाजसाठी हेमांगी कवीची पोस्ट, अभिजीत म्हणाला ‘बाज नहीं आओगी तुम’
राज ठाकरे सलमान खानच्या भेटीला; काय आहे कारण?
ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चनचं असं आहे नातं! ‘हा’ व्हिडीओ पुरावा, असं असताना का होतेय घटस्फोटाची चर्चा?
प्राजक्ता माळीने धरला ‘मदनमंजिरी’ गाण्यावर ठेका, अभिनेत्रीच्या लावणीवर चाहते फिदा
आता रेल्वेप्रवास होणार सुपरफास्ट! नगर – मनमाड रेल्वेमार्गासाठी पढेगाव ते राहुरी चाचणी यशस्वी
…म्हणून शिंदे प्रकरण मुळापासून संपवलं! संजय राऊत यांचा गंभीर आरोप