मुंबईच्या भेटीला अंडरग्राऊंड मेट्रो ‘, पहिला टप्पा लवकरच सुरु, पाहा डिटेल्स

मुंबईच्या भेटीला अंडरग्राऊंड मेट्रो ‘, पहिला टप्पा लवकरच सुरु, पाहा डिटेल्स

मुंबईकर ज्या क्षणाची अनेक वर्षांपासून आतुरतेने वाट पाहात होते तो क्षण अखेर आला आहे. मुंबईची पहिली भूयारी मेट्रो मार्गिका तीनचा पहिला टप्पा लवकरच सेवेत येणार आहे. या अंडरग्राऊंड मेट्रोचा मार्ग खरे तर कुलाबा – बीकेसी – सीप्झ असा 33 किमीचा आहे. परंतू या भूयारी मार्गिकेचा पहिला टप्पा बीकेसी ते आरे कॉलनी लवकरच सेवेत दाखल होणार आहे. तर पाहूयात या सेवेची काय आहेत नेमकी वैशिष्ट्ये

मुंबई मेट्रो – 3 भूयारी मार्ग लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. अंडरग्राउंड मेट्रो कुलाबा-वांद्रे-सीप्झचा पहिला टप्पा BKC ते आरे कॉलनी असा सुरु होतो आहे. पहिल्या टप्प्यातील मेट्रो मार्गिका 12.5 किमी लांबीची आहे. या बीकेसी ते आरे अशा 10 स्थानकांचा समावेश आहे. मेट्रो 3 चे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या टप्प्यातील स्थानके ही 22 ते 28 मीटर जमिनीखाली आहेत. मुंबई विमानतळाजवळील सहार रोड, टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2 ही स्थानके सर्वात जास्त खोलीवर आहे. मुंबई मेट्रो 3 च्या पहिल्या टप्प्यात दहा स्थानके असतील. मेट्रो लाईन 3 चा मार्ग 33.5 किलोमीटर लांब आहे आणि मुंबईच्या उत्तर-दक्षिण दिशांना अधिक चांगल्या प्रकारे जोडण्यासाठी ही मेट्रो डिझाईन केली आहे.

कनेक्टेट टू अनकनेक्टेट

हा मेट्रो मार्ग मुंबईतील सहा प्रमुख व्यावसायिक क्षेत्र, 30 कार्यालयीन क्षेत्र, शैक्षणिक संस्था, प्रमुख रुग्णालयं आणि अनेक वाहतूक केंद्रांना जोडणार आहे. या संपूर्ण भुयारी मेट्रो मार्गिकेवर एकूण 27 स्थानके आहेत. याशिवाय, हा मेट्रो मार्ग शहरातील देशांतर्गत ( डोमेस्टीक ) आणि आंतरराष्ट्रीय ( इंटरनॅशनल )अशा दोन्ही विमानतळांना देखील जोडतो, ज्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.

मुंबईकरांची मेट्रो 3 मार्गिका कशी असणार?

मेट्रो 3 मार्गिका संपूर्ण भूमिगत असणार आहे. ही मेट्रो प्रायोगिक चाचणीत 65 किमी प्रतितास वेगाने धावणार आहे. सध्या या मेट्रोचा वांद्रे बीकेसी ते गोरेगाव- आरे कॉलनीपर्यंत 12.5 किमीचा ट्रायल रन करण्यात येत आहे. दरम्यान मेट्रोची क्षमता ही 100 किमी प्रतितास प्रवास धावण्याची आहे. ही संपूर्ण मेट्रो भारतीय बनावटीची असून आंध्र प्रदेशमधील श्री सिटी येथे ही मेट्रो बनवण्यात आली आहे. मुंबईत मेट्रो 3 च्या सध्या 12 गाड्या दाखल झाल्या आहेत.

भुयारी मेट्रोच्या सुसज्ज सुविधा आणि सुरक्षित प्रवास

मेट्रोचे विशेष म्हणजे नियंत्रण कक्ष विविध अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज केलेला आहे. मेट्रोत प्रवेशाकरता फलाटावरच फुल स्क्रीन डोअर असणार आहे.रुळांवरचे अपघात किंवा आत्महत्येची शक्यता अजिबात नसणार आहे.तसेच ही स्थानकं इंडिकेटर, एक्सलेटर,सीसीटीव्ही यांसारख्या सुविधांनी अद्यायावत असतील. मेट्रोच्या फलाटावर लिफ्टची सोय करण्यात आलीये. दिव्यांगांकरता विशेष शौचालय, बेबी डायपर चेंजींग रुम मोफत इंटरनेट,वायफाय सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पहिला टप्पा ?

मुंबई मेट्रो 3 चा पहिला टप्पा आरे ते बीकेसीपर्यत आहे. ही संपूर्ण भूमिगत  मेट्रो असणार आहे.  आरेपासून बीकेसीपर्यंत यात 10 स्टेशन आहेत, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ही लाईन सुरु होईल… काही डॉक्युमेंटेशन सुरु आहे त्यानुसार पहिल्या आठवड्यात सुरु होईल असा आमचा अंदाज आहे असे एमएमआरसीएलच्या संचालक अश्विनी भिडे यांनी म्हटले आहे. या मेट्रोच्या  दर दिवशी 96 दट्रिप होणार आहेत, एकूण 9 गाड्या आहेत. सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत मेट्रो सुरु असणार आहे.. 48 ट्रेन कॅप्टन आहेत त्यापैकी 10 महिला आहेत.

तर दुसरा टप्पा मार्च 2025 ला सुरु

तिकीट दर पहिल्या टप्प्यासाठी कमीत कमी 10 रुपये जास्तीत जास्त 50 रुपये असेल, ट्रेनचं काम पूर्ण होईल तेव्हा तिकीटचे दर जास्तीत जास्त 70 रुपये असेल. दुसऱ्या टप्यात मोठं मोठी स्थानकं आहेत त्यामध्ये वरळी आणि गिरगांव येथे काम करण्याचे मोठे आव्हान आहे. त्यांचे काम जर डिसेंबरपर्यत झाले मार्च 2025 पर्यत संपूर्ण मार्ग कार्यरत करणे शक्य होईल असेही अश्विनी भिडे यांनी म्हटले आहे.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईच्या भुयारी मेट्रो तीनचं तिकीट किती असणार ? मोठा पाऊस आला तरी मेट्रो सरुच राहणार का ? मुंबईच्या भुयारी मेट्रो तीनचं तिकीट किती असणार ? मोठा पाऊस आला तरी मेट्रो सरुच राहणार का ?
मुंबईच्या पहिल्या वहिल्या भूयारी मेट्रोच्या पहिल्या बीकेसी ते आरे JVLR या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होऊ घातलं आहे....
नवी मुंबई विमानतळावर विमान लँडिंग टेस्टचा मुहूर्त ठरला, 350 विमाने एकाच वेळी पार्क होणार
एसटी महामंडळाची भन्नाट योजना, ज्या दिवशी उत्पन्न वाढणार,त्याच दिवशी प्रोत्साहन भत्ता हाती पडणार !
Akshay Shinde Encounter : ड्रायव्हरजवळ बसलेले PI मागे का गेले? अक्षय शिंदेचा एन्काऊंटर का केला? पोलीस अधिकाऱ्याने सर्व सांगितलं
तिरुपती लाडूच्या वादावरून दोन दिग्गज अभिनेते भिडले, पवन कल्याण यांनी प्रकाश राज यांना सुनावले
Badlapur Protest : आंदोलकांवरील गुन्हे केव्हा मागे घेणार? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल
नवीन मोबाईलची पार्टी दिली नाही म्हणून 16 वर्षांच्या मुलाचा जीव घेतला, मित्रांनीच केला घात