अभ्यासक्रमात आपल्या मुंबईतील डब्बेवाल्या काकांचा धडा; पाठ्यपुस्तकात असेल खास ‘पाठ’

अभ्यासक्रमात आपल्या मुंबईतील डब्बेवाल्या काकांचा धडा; पाठ्यपुस्तकात असेल खास ‘पाठ’

मुंबईतील जग प्रसिद्ध डब्बावाल्या काकांच्या यशाचे आणि व्यवस्थापनाचे धडे आता अभ्यासक्रमात गिरवले जातील. मुंबईतील डब्बावाल्यांचा व्यवसाय जवळपास 130 वर्षांहून अधिक जुना आहे. घराचे जेवण थेट कार्यालयात पोहचविण्याचे व्यवस्थापन मुंबईतील डब्बेवाले अविरतपणे करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल जगातील अनेक दिग्गजांनी घेतली आहे. इंग्लंडचा राजकुमार असो की काही देशांचे राष्ट्राध्यक्ष अनेक जण डब्बेवाल्यांमुळे प्रभावित झाले आहेत. आता त्यांचा धडा अभ्यासक्रमात आला आहे. इयत्ता 9 वीच्या अभ्यासक्रमात डब्बावाल्यांचा धडा असेल.

केरळ सरकारचा मोठा निर्णय

केरळच्या इयत्ता 9 वीतील इंग्रजीच्या पुस्तकात द सागा ऑफ द टिफिन कॅरियर्स या नावाने हा पाठ असेल. या धड्याचे लेखक ह्युग आणि कोलीन गँटजर आहेत. केरळ राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (SCERT) 2024 साठी आताच्या अद्ययावत अभ्यासक्रमात डब्बेवाल्याच्या कथेचा समावेश आहे. या धड्यात डब्बेवाल्यांची सुरुवात कशी झाली. त्यांचे व्यवस्थापन याची माहिती देण्यात आली आहे.

130 वर्षांहून अधिकची सेवा

मुंबईत डब्बे पोहचवण्याचा हा व्यवसाय जवळपास 130 वर्षांहून अधिक जुना आहे. डब्बेवाले घरातून गरमागरम डब्बा मुंबईकरांना त्यांच्या कार्यालयात नेऊन पोहचवतात. त्यामुळे चाकरमान्यांची खाण्याची अबाळ होत नाही. त्यांना घराच्या जेवणाची लज्जत चाखता येते. या डिलिव्हरी सिस्टमची जगभरात ख्याती पसरली आहे. इंग्लंडचा राजा, अनेक देशाचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांनी पण या कामाचे तोंडभरून कौतुक केले आहे. मुंबईत सायकलवर एकाचवेळी अनेक डब्बे दिसतात. सरकारी आणि खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या चाकरमान्यांना घरगुती जेवणाचा आनंद त्यांच्यामुळे मिळतो. विशेष म्हणजे या पद्धतीत डब्बा बदलल्याची तक्रार समोर येत नाही. त्यांचा व्यवस्थापनाची ही एक खास बाब आहे.

रोज 2 लाख मुंबईकरांना पोहचतो डब्बा

मुंबईतील डब्बावाला संघटनेशी जवळपास 5 हजारांहून अधिक जण जोडल्या गेले आहेत. ते जवळपास 2 लाखांहून अधिक जणांना डब्बा पोहचवण्याचे काम करतात. महादु हावजी बचे यांनी 1890 मध्ये या डब्बे पोहचविण्याची सेवा सुरू केली होती. सुरूवातीला हे सेवा केवळ 100 ग्राहकांपर्यंत मर्यादीत होती. पण जस जसं शहरं वाढलं. डब्बा वितरणाची प्रणाली व्यापक झाली.

डब्बेवाल्यांचा खास पोशाख आहे. पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा, डोक्यावर गांधी टोपी आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ, पायात कोल्हापुरी चप्पल असा त्यांचा पेहराव असतो. जगातील अनेक मोठं-मोठ्या बिझनेस स्कूलने त्यांच्यावर संशोधन केले आहे. त्यांच्यावर डॉक्युमेंट्रीज, पुस्तकं आणि कॉमिक बुक पण काढण्यात आले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मविआत मोठा गेम, अभिनेत्री स्वरा भास्करचा पती फहद अहमद सपाकडून अणुशक्तीनगरच्या जागेसाठी इच्छुक, नवाब मलिकांची चिंता वाढणार? मविआत मोठा गेम, अभिनेत्री स्वरा भास्करचा पती फहद अहमद सपाकडून अणुशक्तीनगरच्या जागेसाठी इच्छुक, नवाब मलिकांची चिंता वाढणार?
महाविकास आघाडीत जागावाटपांसाठी बैठकांचं सत्र पार पडत आहे. या जागावाटपात कुणाला किती जागा मिळतात? हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. विशेष...
मुंबईच्या भेटीला अंडरग्राऊंड मेट्रो ‘, पहिला टप्पा लवकरच सुरु, पाहा डिटेल्स
प्रियांशू चटर्जीचा लेटेस्ट फोटो समोर, इतका बदलला अभिनेत्याचा लूक, ओळखणं कठीण
‘बिग बॉस मराठी 5’मधून अरबाज पटेलने केली तगडी कमाई; 8 आठवड्यांसाठी मिळालं इतकं मानधन
करीना कपूरच्या सौंदर्यामागचं रहस्य अखेर समोर, ‘या’ 3 स्वस्त गोष्टी तुमच्याही स्वयंपाक घरात नक्की असतील
‘मुलगी पसंत आहे’ मालिकेत प्रिया बेर्डे यांची धमाकेदार एन्ट्री, झळकणार ‘या’ भूमिकेत
Video : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात रंगणार नवा खेळ; स्पर्धकांच्या चेहऱ्यांवर लागणार रंग