युवासेनेचा सुप्रीम कोर्टातही विजय; सिनेट निवडणुकीविरोधातील याचिकाकर्त्याने याचिका घेतली मागे

युवासेनेचा सुप्रीम कोर्टातही विजय; सिनेट निवडणुकीविरोधातील याचिकाकर्त्याने याचिका घेतली मागे

>> मंगेश मोरे

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक घेण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट नकार दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्यांचीच सर्वोच्च न्यायालयाने कानउघाडणी केली. याचिका फेटाळून लावू की तुम्ही स्वतःहून याचिका मागे घेताय, असा खडा सवाल करीत न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारले. त्यानंतर याचिकाकर्त्याने याचिका मागे घेतली. त्यामुळे युवासेनेच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने सिनेट निवडणूक घेण्यासाठी दिलेला आदेश कायम राहिला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे (मासू) संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. सिद्धार्थ इंगळे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय आणि न्यायमूर्ती एस. व्ही. एन. भाटी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. मोहिनी प्रिया, युवा सेनेतर्फे अ‍ॅड. सिद्धार्थ मेहता, मुंबई विद्यापीठातर्फे अ‍ॅड. युवराज नरवणकर आणि अ‍ॅड. अनिरुद्ध जोशी यांनी बाजू मांडली. सर्व पक्षकारांचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने याचिकाकर्त्याला धारेवर धरले.

सिनेट निवडणुकीची मतदान प्रक्रिया आधीच सुरु झाली आहे. तसेच तुमची याचिका पूर्णपणे गुणवत्ताहीन आहे. याचिकेवर तुमचा युक्तिवाद ऐकून घेण्यासाठी कुठलीही गुणवत्ता आम्हाला दिसून येत नाही. त्यामुळे गुणवत्ता नसल्याच्या आधारे आम्ही याचिका फेटाळण्याचा आदेश देऊ की तुम्ही स्वतःहून याचिका मागे घेताय? असा सवाल खंडपीठाने याचिकाकर्त्याच्या वकिलांना केला. त्यावर याचिकाकर्त्याने याचिका मागे घेण्याची तयारी दाखवली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईच्या भुयारी मेट्रो तीनचं तिकीट किती असणार ? मोठा पाऊस आला तरी मेट्रो सरुच राहणार का ? मुंबईच्या भुयारी मेट्रो तीनचं तिकीट किती असणार ? मोठा पाऊस आला तरी मेट्रो सरुच राहणार का ?
मुंबईच्या पहिल्या वहिल्या भूयारी मेट्रोच्या पहिल्या बीकेसी ते आरे JVLR या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होऊ घातलं आहे....
नवी मुंबई विमानतळावर विमान लँडिंग टेस्टचा मुहूर्त ठरला, 350 विमाने एकाच वेळी पार्क होणार
एसटी महामंडळाची भन्नाट योजना, ज्या दिवशी उत्पन्न वाढणार,त्याच दिवशी प्रोत्साहन भत्ता हाती पडणार !
Akshay Shinde Encounter : ड्रायव्हरजवळ बसलेले PI मागे का गेले? अक्षय शिंदेचा एन्काऊंटर का केला? पोलीस अधिकाऱ्याने सर्व सांगितलं
तिरुपती लाडूच्या वादावरून दोन दिग्गज अभिनेते भिडले, पवन कल्याण यांनी प्रकाश राज यांना सुनावले
Badlapur Protest : आंदोलकांवरील गुन्हे केव्हा मागे घेणार? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल
नवीन मोबाईलची पार्टी दिली नाही म्हणून 16 वर्षांच्या मुलाचा जीव घेतला, मित्रांनीच केला घात