कामोठ्यात चोरट्यांनी कारचे टायरच पळवले

कामोठ्यात चोरट्यांनी कारचे टायरच पळवले

घरफोड्या, चेन स्नॅचिंग, लुटपाटच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना कामोठ्यात आता हात की सफाईचा नवीन फंडा भामट्यांनी अजमावला आहे. या चोरट्यांनी चक्क कारचे टायरच पळवल्याची बाब उघडकीस आली आहे. या चोरट्यांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारचे मागील दोन्ही टायर काढून घेतले आणि पोबारा केला. याप्रकरणी कामोठे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कामोठे येथील सेक्टर 19 मधील प्रेसिडेन्सी हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणारे विनायक शिराळकर हे लेखापरीक्षक म्हणून काम करतात. त्यांनी एमएच 02 सीबी 1633 ही व्हॅगनार कार सोसायटीजवळील रस्त्यावर पार्क करून ठेवली होती. चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन चोरी करण्याच्या उद्देशाने गाडीचा लॉक तोडला. गाडीतले सगळे सामान अस्ताव्यस्त केले, पण यावेळी चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. त्यानंतर चोरट्यांनी गाडीतल्या जॅकचा वापर करून मागचे दोन्ही टायर काढले आणि पोबारा केला. विनायक सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले तेव्हा त्यांना गाडीचे टायर चोरट्यांनी पळवल्याचे लक्षात आले.

भामटे सीसीटीव्हीमध्ये कैद

कामोठे पोलिसांनी घटनास्थळाजवळील परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने या चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. हे चोरटे जवळच असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. हे सराईत चोरटे असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यांनी यासारखे आणखी काही गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आशिष शेलारांना घेरण्यासाठी काँग्रेस वांद्रे पश्चिममध्ये तगडा उमेदवार देणार, वर्षा गायकवाड कोणाला भेटल्या? आशिष शेलारांना घेरण्यासाठी काँग्रेस वांद्रे पश्चिममध्ये तगडा उमेदवार देणार, वर्षा गायकवाड कोणाला भेटल्या?
पुढच्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल अशी अपेक्षा आहे. नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. सर्वच पक्ष...
Akshay Shinde Encounter : मोठी अपडेट ! अक्षयचं एन्काऊंटर कुठे झालं? फॉरेन्सिक टीमला पोलीस व्हॅनमध्ये काय सापडलं?
मुख्य आरोपींना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या; संजय राऊतांचे सरकारवर गंभीर आरोप
सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या टोपलीत उंदरांचा वावर ? प्रशासनाचं म्हणणं काय ?
लाल ड्रेस, फ्लाइंग किस अन् लग्नाची अंगठी.. ऐश्वर्या रायच्या रॅम्प वॉकची तुफान चर्चा
“अशा पुरुषांना..”; पत्नीला तोकडे कपडे घालण्याची परवानगी देणाऱ्या पुरुषांवर भडकली सना
हल्ली दर महिन्याला घटस्फोट..; तरुण पिढीबद्दल काय म्हणाल्या आशा भोसले?