आली गवर आली, सोनपावली आली…आज घरोघरी गौराईचे आगमन

आली गवर आली, सोनपावली आली…आज घरोघरी गौराईचे आगमन

गणरायापाठोपाठ मंगळवारी गौरींचे  आगमन होणार आहे. सासरी गेलेली लेक जशी माहेरी येते तशी गौराई माहेराला येणार. आली गवर आली, सोनपावली आली… असे म्हणत घरोघरी तिचे स्वागत होईल. गौराईच्या पाहुणचारात कुठेही कमी राहू नये यासाठी मार्केटमध्ये खरेदीचा उत्साह आहे. कीर्तिकर मार्केट, दादरचे रानडे रोड, क्रॉफर्ड मार्केट, विलेपार्ले मार्केट येथे खरेदीसाठी महिलांनी गर्दी केली.

या वर्षी मंगळवार, 10 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजून 2 मिनिटांपर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रामध्ये राहणार आहे. म्हणून मंगळवार, 10 सप्टेंबर रोजी रात्री 8-02पर्यंत ज्येष्ठा गौरी आणाव्यात. बुधवार, 11 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीपूजन करावे. गुरुवार, 12 सप्टेंबर रोजी रात्री 9.51पर्यंत मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन करावे, असे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

ज्येष्ठा गौरी म्हणजे गणेशाची माता पार्वती! पार्वतीबरोबर तिच्या सखीचेही पूजन करण्याची प्रथा आहे. काही घराण्यात खडय़ाच्या गौरी आणतात, काही घराण्यात धान्याच्या राशीवर मुखवटे ठेवून त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी तेरडय़ाच्या गौरी पूजतात. गौरीच्या सणाला सासरी गेलेली मुलगी माहेरी येते. गौरीला 16 प्रकारचे नैवेद्य, 16 प्रकारच्या भाज्या अर्पण करतात.

फळा-फुलांना मागणी

गौरी सजवण्यासाठी लागणारी फुले, वेण्या तसेच तिच्या प्रसादासाठी फळे खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी आहे. गौरीसाठी वेण्या 30 रुपयांपासून उपलब्ध आहेत. चाफ्याचे फूल 10 ते 12 रुपये दराने विकले जात आहे. तर फळांचे दर चढे आहेत. गौरीला सजवण्यासाठी साडी, दागिने यांची खरेदी होतेय. नऊवारी, सहावारी रेडीमेड साडय़ाही बाजारात उपलब्ध आहेत. फेटाधारी गौरीचे मुखवटे यंदाचे आकर्षण आहे. मंगळसूत्र, पंठी, बोरमाळ, लक्ष्मीहार, कमरपट्टा अशा पारंपरिक दागिन्यांकडे महिलांचा कल आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Akshay Shinde Encounter : दोन्ही हातात बेड्या असताना… अक्षय शिंदे एन्काऊंटरवरून सुषमा अंधारे यांनी वेधलं त्या मुद्द्याकडे लक्ष; पोलिसांनाच विचारला जाब Akshay Shinde Encounter : दोन्ही हातात बेड्या असताना… अक्षय शिंदे एन्काऊंटरवरून सुषमा अंधारे यांनी वेधलं त्या मुद्द्याकडे लक्ष; पोलिसांनाच विचारला जाब
बदलापूर मधील शाळेतील चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाल्यानंतर विरोधकांकडून याप्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित...
‘तुम्हाला पटेल किंवा..’ अरबाजसाठी हेमांगी कवीची पोस्ट, अभिजीत म्हणाला ‘बाज नहीं आओगी तुम’
राज ठाकरे सलमान खानच्या भेटीला; काय आहे कारण?
ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चनचं असं आहे नातं! ‘हा’ व्हिडीओ पुरावा, असं असताना का होतेय घटस्फोटाची चर्चा?
प्राजक्ता माळीने धरला ‘मदनमंजिरी’ गाण्यावर ठेका, अभिनेत्रीच्या लावणीवर चाहते फिदा
आता रेल्वेप्रवास होणार सुपरफास्ट! नगर – मनमाड रेल्वेमार्गासाठी पढेगाव ते राहुरी चाचणी यशस्वी
…म्हणून शिंदे प्रकरण मुळापासून संपवलं! संजय राऊत यांचा गंभीर आरोप