पशुधन पर्यवेक्षकासह कनिष्ठ सहायक लेखाधिकारी निलंबित, संगणक खरेदीमध्ये अनियमितता; सांगली जि.प. सीईओंची कारवाई

पशुधन पर्यवेक्षकासह कनिष्ठ सहायक लेखाधिकारी निलंबित, संगणक खरेदीमध्ये अनियमितता; सांगली जि.प. सीईओंची कारवाई

सांगली जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामध्ये 29 लाखांच्या संगणक, प्रिंटर आणि यूपीएस खरेदीमध्ये अनियमितता आढळल्याप्रकरणी पशुधन पर्यवेक्षक जैनुद्दिन मुल्ला, कनिष्ठ सहायक लेखाधिकारी प्रवीण चव्हाण यांच्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच तीन वरिष्ठ अधिकाऱयांच्या कारवाईचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला आहे.

सांगली जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामध्ये 29 लाख रुपयांचे 42 संगणक, 42 प्रिंटर आणि 42 यूपीएस मशीन खरेदी केल्या होत्या. पण, खरेदीची ही प्रक्रिया पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने राबविल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्याने जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांच्या नेतृत्वाखाली तीन अधिकाऱयांची समिती गठीत केली होती.

या समितीने चौकशी अहवाल दिल्यानंतर पशुसंवर्धन विभागातील कनिष्ठ सहायक लेखाधिकारी प्रवीण चव्हाण, पशुधन पर्यवेक्षक जैनुद्दिन मुल्ला, तत्कालीन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग, मुख्य वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाण, तत्कालीन लेखाधिकारी राहुल कदम, पशुधन विकास अधिकारी डॉ. आदित्य गुंजाटे आदींना संगणक खरेदीमध्ये अनियमितता झाल्याबद्दल नोटीस बजावली होती. नोटिसांना उत्तर आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे यांनी 6 सप्टेंबर 2024 रोजी कनिष्ठ सहायक लेखाधिकारी चव्हाण, पशुधन पर्यवेक्षक मुल्ला यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. चव्हाण यांना तासगाव पंचायत समिती, तर मुल्ला यांना कवठेमहांकाळ पंचायत समितीमध्ये उपस्थित राहण्याची सूचना दिली आहे. तसेच उर्वरित अधिकारी वर्ग एकचे असल्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा अधिकार राज्य शासनाचा आहे. म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्याचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला आहे, असे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱयांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मविआत मोठा गेम, अभिनेत्री स्वरा भास्करचा पती फहद अहमद सपाकडून अणुशक्तीनगरच्या जागेसाठी इच्छुक, नवाब मलिकांची चिंता वाढणार? मविआत मोठा गेम, अभिनेत्री स्वरा भास्करचा पती फहद अहमद सपाकडून अणुशक्तीनगरच्या जागेसाठी इच्छुक, नवाब मलिकांची चिंता वाढणार?
महाविकास आघाडीत जागावाटपांसाठी बैठकांचं सत्र पार पडत आहे. या जागावाटपात कुणाला किती जागा मिळतात? हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. विशेष...
मुंबईच्या भेटीला अंडरग्राऊंड मेट्रो ‘, पहिला टप्पा लवकरच सुरु, पाहा डिटेल्स
प्रियांशू चटर्जीचा लेटेस्ट फोटो समोर, इतका बदलला अभिनेत्याचा लूक, ओळखणं कठीण
‘बिग बॉस मराठी 5’मधून अरबाज पटेलने केली तगडी कमाई; 8 आठवड्यांसाठी मिळालं इतकं मानधन
करीना कपूरच्या सौंदर्यामागचं रहस्य अखेर समोर, ‘या’ 3 स्वस्त गोष्टी तुमच्याही स्वयंपाक घरात नक्की असतील
‘मुलगी पसंत आहे’ मालिकेत प्रिया बेर्डे यांची धमाकेदार एन्ट्री, झळकणार ‘या’ भूमिकेत
Video : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात रंगणार नवा खेळ; स्पर्धकांच्या चेहऱ्यांवर लागणार रंग