मी मुंबईत मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही, त्याच्या रिक्षात बसणार नाही! उत्तर प्रदेशातील टीसीची मुजोरी

मी मुंबईत मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही, त्याच्या रिक्षात बसणार नाही! उत्तर प्रदेशातील टीसीची मुजोरी

मुंबईत राहत असताना मी कोणत्याही महाराष्ट्रीयन व्यक्तीला बिझनेस देणार नाही, त्याच्या रिक्षात बसणार नाही, अशी उद्दाम भाषा आशीष पांडे या टीसीने केली. तो मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. त्याच्या संभाषणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताच तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्याची गंभीर दखल घेत तत्काळ रेल्वे सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

आशीष पांडेची मराठी व्यक्तीसोबतची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. मी विक्रोळी टागोरनगरात राहतो. मी मराठी आणि मुस्लिम व्यक्तीला कधीही बिझनेस देत नाही. त्याच्या रिक्षात मी बसत नाही. यूपीतला रिक्षावाला असेल तरच मी रिक्षात बसतो, अशी उद्दाम भाषा आशीष पांडे याने केली आहे. मी परवाच ट्रु कॉलरमध्ये तुमचा नंबर बघितला. तुम्ही मराठी आहात हे बघितल्यानंतर मी तुमचा नंबर डिलीट केला, हे तुम्हाला माहिती असेलच. कारण मला मुस्लिम आणि महाराष्ट्रीयन माणसाला बिझनेस द्यायचाच नाही, असे आशीष पांडे म्हणाला.

चौकशीचे आदेश

आशीष पांडेची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या महाराष्ट्रद्वेष्टय़ा अधिकाऱयावर कारवाईची मागणी नेटकऱयांनी केली. त्या सर्वांची गंभीर दखल घेत पांडेवर निलंबनाची कारवाई रेल्वेने केली आहे. त्याच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. आशीष पांडे हा पश्चिम रेल्वेच्या सेवेत होता.

मी 9 वाजता कामाला जातो आणि 10 वाजेपर्यंत 5 हजार रुपये कमावतो. मला पैशाचा गर्व नाही, पण मी तुम्हाला एकच सांगतो, मी मुंबईत असेपर्यंत मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही, असे सांगून आशीष पांडेने फोन ठेवून दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पराभवाची भीती, मिंध्यांनी पाडला घोषणांचा पाऊस पराभवाची भीती, मिंध्यांनी पाडला घोषणांचा पाऊस
राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये पराभवाची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे वारकरी, बालगृहातील शिक्षकेतर कर्मचारी, धान उत्पादक, ब्राह्मण, राजपूत, कुणबी समाज, दूध...
आज सिनेटसाठी मतदान! युवासेनेचे 10 शिलेदार निवडणुकीच्या मैदानात
आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, मुंब्रा बायपासवर थरार… पोलीस व्हॅनमध्ये बंदूक हिसकावून गोळीबार; पोलिसांच्या प्रत्युत्तरात शिंदे जागीच ठार
बेस्टच्या वाहक-चालकांना संरक्षण द्या, वडाळा आगारात कामगारांची निदर्शने
भरत राजाप्रमाणे चार महिने राज्यकारभार पाहणार, नव्या मुख्यमंत्री आतिशी यांनी स्वीकारला पदभार
चाइल्ड पॉर्न पाहणे आणि डाऊनलोड करणे हा गुन्हाच, सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला मद्रास हायकोर्टाचा निकाल
जुन्या पेन्शनसाठी एसटीचे सेवानिवृत्त कर्मचारी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर करणार आत्मक्लेश आंदोलन