खेळाच्या मैदानावर रुग्णालय उभारण्याच्या निर्णयाला आव्हान, उच्च न्यायालयात याचिका दाखल; उद्या तातडीची सुनावणी

खेळाच्या मैदानावर रुग्णालय उभारण्याच्या निर्णयाला आव्हान, उच्च न्यायालयात याचिका दाखल; उद्या तातडीची सुनावणी

नवी मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील खेळाच्या मैदानाचा मोठा भूखंड वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बांधकामासाठी देण्याच्या सिडकोच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. 40 प्लस मास्टर क्रिकेटर्स असोसिएशनने अॅड. अक्षय मालविया व अॅड. हर्षवर्धन सूर्यवंशी यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर बुधवारी तातडीने सुनावणी होणार आहे.

सीबीडी-बेलापूर येथील दोन रेल्वे ट्रक व जेएनपीटी हायवेदरम्यान असलेल्या सेक्टर 15-ए परिसरात खेळाचे मैदान आहे. हे मैदान सध्या याचिकाकर्त्या असोसिएशनद्वारे वापरले जात आहे. असोसिएशनने निःस्वार्थी भावनेने मैदान विकसित केले आहे. यापूर्वी सिडको व नवी मुंबई महापालिकेमार्फत या जागेचा डम्पिंग ग्राउंड म्हणून वापर केला जायचा. आता याठिकाणी स्थानिक नागरिक व असोसिएशनने काही झाडे लावली आहेत. सीबीडी-बेलापूरचे स्थानिक नागरिकही मैदानाचा वापर करीत आहेत. हे मैदान ‘कोस्टल रेग्युलेशन झोन’मध्ये मोडते. नागरिकांसाठी उपयोगी असलेले मैदान रुग्णालय बांधकामासाठी देण्याचा सिडकोचा निर्णय नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारा आहे, असा दावा याचिकेत केला आहे. ज्येष्ठ वकील अनिल अंतुरकर यांनी सोमवारी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय व न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाचे याचिकेकडे लक्ष वेधले. त्यांच्या युक्तिवादाची गंभीर दखल घेत खंडपीठाने बुधवारी सुनावणी ठेवली. नियोजित रुग्णालय बांधकामाचा निविदा प्रस्ताव रद्द करण्याची विनंती याचिकेतून केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला वांद्रय़ात भूखंड क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला वांद्रय़ात भूखंड
क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला सुसज्ज क्रीडा सुविधा केंद्र उभारण्यासाठी वांद्रे रिक्लेमेशन येथील दोन हजार चौरस मीटरचा भूखंड देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ...
खेळाच्या मैदानावर रुग्णालय उभारण्याच्या निर्णयाला आव्हान, उच्च न्यायालयात याचिका दाखल; उद्या तातडीची सुनावणी
शाळांमध्ये सीसीटीव्ही, महिला सुरक्षा रक्षक नेमणुकीच्या खर्चासाठी सरकारकडे पाठपुरावा; महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे आश्वासन
आम्ही 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युनोच्या महासभेत दावा
‘लाडू’ वादानंतर तिरुपती मंदिराचे शुद्धीकरण! महाशांती होम, स्वयंपाकघर गोमूत्राने धुतले
छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन नक्षलवादी ठार
धर्मनिरपेक्षता ही युरोपियन संकल्पना, तामीळनाडूच्या राज्यपालांचे विधान