Shubaman Gill – Sara Tendulkar : का रे दुरावा ? ‘या’ अभिनेत्रीमुळे शुबमन-सारा झाले दूर ?

Shubaman Gill – Sara Tendulkar : का रे दुरावा ? ‘या’ अभिनेत्रीमुळे शुबमन-सारा झाले दूर ?

क्रिकेट आणि बॉलिवूडच जुने नाते आहे. असे अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांनी चित्रपटातील कलाकारांना आपले जीवनसाथी म्हणून निवडले आहे. याच कारणामुळे दररोज कोणत्या ना कोणत्या क्रिकेटपटूचे नाव टीव्ही किंवा चित्रपटातील स्टारशी जोडले जाते. भारतीय सलामीवीर शुबमन गिल देखील याच कारणामुळे चर्चेत आहे. तो, मास्टर ब्लास्टर स सचिन तेंडुलकरची मुलगी सारा हिला डेट करत असल्याच्या बातम्या बऱ्याच काळापासून कानावर येत आहेत. खरंतर एका शोमध्ये त्याने स्वतःच साराचं नाव घेतलं होतं. तसेच त्याच्या मित्रानेही काही खुलासे केले. पण आता त्यात एक नाव ट्विस्ट आलाय कारण सारा-शुबमनने इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्याने त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्या. आणि त्यांच्यातील या दुराव्यासाठी दुसरी एक अभिनेत्री कारणीभूत ठरल्याचेही बोलले जात आहे.

सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल वेगळे झाल्याच्या अफवा आहेत. आणि त्यामागे एक टीव्ही अभिनेत्री असल्याचं काहींचं म्हणणं आहे. खरंतर ही टीव्ही अभिनेत्री शुभमन गिलमुळे बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. ती दुबईला मॅच पाहण्यासाठीही गेली होती, त्यानंतर तिचे नाव त्या शुबमनशी जोडले जात आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून टीव्ही कलाकार अवनीत कौर आहे.

तिच्यामुळे सारा-शुबमन झाले वेगळे ?

खरंतर अवनीत कौरने शुबमन गिलला त्याच्या गेल्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या होत्या. त्याआधीही दोघे एकत्र दिसले होते. मात्र, त्यावेळी इतर मित्रही त्याच्यासोबत होते. शुबमन गिल आणि अवनीत कौर यांना लंडनमध्येही एका ग्रुपसोबत पाहिले गेले. पण तेव्हाही दोघे कधीच एकटे दिसले नाहीत. तसंच दोघेही एकमेकांना इंस्टाग्रामवर फॉलोही करत नाहीत. पण अवनीत कौर अनेकदा भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचते. ती दुबईमध्येही दिसली होती, पण आता तिला ट्रोल केलं जात आहे.

X वर अनेक लोकं हे सारा-शुबमनच्या ब्रेकअपसाठी अवनीतला जबाबदार ठरवत आहेत. पण हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, अवनीत कौर आणि राघव शर्मा गेल्या तीन-चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. राघव शर्मा, हा एक निर्माता आहे, त्याची शुबमन गिलशी चांगली मैत्री आहे. अवनीत कौरही राघवच्या माध्यमातून शुबमनला भेटली. तथापि, राघव शर्मा आणि अवनीत कौर यांनी अद्याप त्यांचे नाते अधिकृत केलेले नाही. तर, अवनीत आणि शुबमन फक्त मित्र आहेत, पण लोक तिच्या फोटोंवर शुबमन गिलबद्दल कमेंट करतात. अवनीत कौर हा टीव्हीतील एक प्रसिद्ध चेहरा असून तिने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे.

कोणा-कोणाशी जोडलं गेलं शुबमनचं नाव ?

खरंतर, शुबमन गिलचं नाव बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानसोबतही जोडले गेलं होतं. पण साराने एका मुलाखतीत सांगितलं होतं की लोकांचा दोन्ही सारांमध्ये गोंधळ होतोय. एवढंच नव्हे तर शुबमन गिलचं टीव्ही अभिनेत्री रिद्धिमा पंडितसोबत लग्न झाल्याच्या बातम्या आल्या. पण ही बातमी चुकीची असल्याचे अभिनेत्रीने स्पष्ट केलं होतं.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्यात पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, विवेक जॉन्सन बीडचे नवे जिल्हाधिकारी राज्यात पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, विवेक जॉन्सन बीडचे नवे जिल्हाधिकारी
राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरुच आहेत. मंगळवारी आणखी पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यातच बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक...
हिंदीची सक्ती केली तर मी मरेन! भाजप आमदाराची झाली गोची
Pahalgam Terror Attack – पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू, सूत्रांची माहिती
IPL 2025 – भाऊ तुला मानलं! युवा खेळाडूंसाठी शिवम दुबेकडून लाखमोलाच्या मदतीची घोषणा
तारक मेहता का उल्टा चष्मामधील अभिनेत्याने जीवन संपवले, आर्थिक अडचणींमुळे उचलले टोकाचे पाऊल
Pahalgam Terror Attack – पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध, केंद्राचे पोकळ दावे उघड, राहुल गांधींची टीका
Chandrapur News – शहरातील विविध वार्डात भीषण पाणीटंचाई, रोज 180 टँकर फेऱ्या; प्रशासन ढिम्म